आमदार डॉ. संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेची आढावा बैठक-अतिक्रमण, आरोग्य, विकास कामे व शिस्तबद्ध व्यवस्था यावर देणार भर...


 
आमदार डॉ. संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेची आढावा बैठक-अतिक्रमण, आरोग्य, विकास कामे व शिस्तबद्ध व्यवस्था यावर देणार भर...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

दिनांक 27/06/2025 रोजी नगर परिषद जळगाव जामोद येथे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बांधकाम विभागाच्या पूर्ण व अपूर्ण कामाचा आढावा घेण्यात आला, कामे वेळेत व गुणवत्तेसह पूर्ण करण्याचे निर्देश डॉ .संजय कुटे यांनी दिले. आरोग्य विभागाच्या मान्सूनपूर्व तयारीबाबत स्वच्छता, नाले सफाई, औषध फवारणी व पाण्याच्या स्वच्छते संबंधी तयारीचा आढावा सभेत घेण्यात आला.रमाई आवास व प्रधानमंत्री आवास योजनेतीत प्रलंबित प्रकरणे, लाभाथ्यांना मिळनारा लाभ व अंमलबजावणी प्रक्रियेला गती देण्यावर भर दिला, सांस्कृतिक भवन व ग्रंथालय वांच्या कार्यप्रणालीचा आढावा घेऊन त्याचा प्रभावी वापर करण्याची गरज व्यक्त केली.दुर्गा चौक व आंबेडकर चौक परिसरातील अतिक्रमणांमुळे वाहतुकीस व शालेय विद्यार्थीनींना होणारा त्रास यामुळे अतिक्रमन तात्काळ हटविण्याचे स्पष्ट निर्देश डॉ. संजय कुटे यांनी दिले. तसेच शहरातील रस्त्यांवर लागलेले अनधिकृत बॅनर, पोस्टर व जाहिरात फलक हटवण्यासाठी मोहीम राबवावी असेही निर्देश दिले.शहरातील उघड्यायावर चालणारी मांस विक्रीची दुकाने आरोग्यास घातक ठरत असल्याने, ती सर्व मांसविक्रीची दुकाने तात्काळ हटवून केवळ मटन मार्केटमध्ये सूरू ठेवामीत असे निर्देश डॉ संजय कुटे यांनी या सभेमध्ये दिले.बैठकीच्या शेवटी सर्व विभागांना नागरिकांच्या सोयीसा‌ठी कार्यक्षम, पारदर्शक आणि वेळेवर सेवा देण्याचे निर्देश देण्यात आले.सदर आढावा सभेच्या अध्यक्षस्थानी जळगांव जामोद विधानसभेचे आमदार डॉ. संजय कुटे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सूरज जाधव,  डॉ.  इकबाल शेख, श्री प्रकाश राउत ,सर्व पत्रकार बांधव नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post