जळगाव जामोद मतदारसंघात वाढणार आता खजूर पिकाचे क्षेत्र आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पुढाकार...


 
जळगाव जामोद मतदारसंघात वाढणार आता खजूर पिकाचे क्षेत्र आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पुढाकार...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ, संजयजी  कुटे यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यामध्ये पारंपारिक फळ पिकांना बगल देऊन खजूर लागवडीचे क्षेत्र वाढीसाठी शेतकरी परिसंवादाचे व चर्चा सत्राचे नगरपरिषदेच्या योगा हॉलमध्ये आज तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद यांच्या वतीनेआयोजन करण्यात आले होते, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या दोन्हीही तालुक्यामध्ये केळी आणि संत्रा बागांचे मोठ्या प्रमाणात गेल्या दोन ते तीन वर्षापासून लागवडीचे प्रमाण वाढले आहे परंतु बदलते हवामान आणि त्याचा कृषी क्षेत्रावरील होणारा विपरीत परिणाम यामुळे संत्रा पिकाचे बहार नियोजनामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत त्याचबरोबर केळी पिकावर सुद्धा याचा विपरीत परिणाम होत आहे याचा सर्वांगीण विचार करू तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे एक सक्षम पर्याय म्हणून माननीय डॉ संजयजी कुटे आमदार जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद यांनी एक दिवसीय खजूर लागवड परिषदेचे जळगाव जामोद नगरपरिषद च्या योगा हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते, खजूर लागवडी पासून अतिशय भरघोस असा नफा मिळवणारे श्री अप्पासाहेब शेंडगे उपविभागीय कृषी अधिकारी तथा विषय विशेषज्ञ तथा नानाजी देशमुख कृषी संजीवनी विकास प्रकल्प चे संचालक जिल्हा जालना तथा त्यांचे बंधू दादासाहेब शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  मार्गदर्शनामध्ये खजूर उत्पादक व लागवडीसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांची जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यामधील शेतकऱ्यांची सभा आज योगा हॉलमध्ये माननीय आमदार डॉ,संजयजी कुटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, सदर सभेमध्ये आप्पासाहेब शेंडगे व त्यांचे खजूर उत्पादक बंधू जगदीश शेंडगे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत तसेच खजूर पिकाचे उत्पादन कसे करता येईल याच्याबाबत सविस्तर माहिती त्यांच्या स्वानुभावामधून त्यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना सांगितली, तसेच श्री आप्पासाहेब शेंडगे जालना , उपविभागीय कृषी अधिकारी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जिल्हा जालना यांनी खजूर पिकाचे पीक व्यवस्थापन व मार्केटिंग याबद्दल  सविस्तर असे मार्गदर्शन सभेमध्ये केले व  तसेच खजूर पिकाबद्दल पिकाबद्दल तांत्रिक मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले, बाजार खजूर पिकाचे विक्री व्यवस्थापन  आणि बाजारामध्ये असलेल्या संधी याबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनानंतर उपस्थित शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे निरसन दोन्ही बंधूंनी त्या ठिकाणी केले, ज्यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम आयोजित केला असे या जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे जलपुरुष सन्माननीय आमदार डॉ, संजयजी कुटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना खजूर पिकाची लागवड पद्धत त्याचे भविष्यातील नियोजन आणि बाजार व्यवस्थापन याच्याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले भविष्यामध्ये फार्मर प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ खजूर लागवड नव्हेच, तर वनौषधी, बांबू लागवड यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध कसे करता येईल याबाबत सखोल असे मार्गदर्शन आणि भविष्यामधील नियोजनाविषयी विस्तारपूर्वक अशी चर्चा केली,  विविध जैविक निविष्ठा शेतकऱ्यांच्या बांधांवरती तयार करून त्यांच्या शेतमालाचे व फळ पिकांचे कसे मूल्यवर्धन होईल याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन, त्याचबरोबर आपण यामध्ये स्वतः पुढाकार घेणार असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची भावना त्यांनी प्रकाश यांनी बोलून दाखवली आणि बळीराजाच्या सुखदुःखामध्ये आपण सदैव सोबत राहून त्याचे जीवनमान कसे उंचावता येईल याबाबत येणाऱ्या कालावधीमध्ये मतदारसंघांमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून कायमस्वरूपी व चिरकाल काम करण्याची धोरण असणार असल्याचे भाऊंनी आपल्या मार्गदर्शनामध्ये व्यक्त केले ,सदर सभेला जामोद व संग्रामपूर तालुक्यातील नव्हे तर आकोट आणि मलकापूर व शेगाव येथील शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या सभेला शेतकऱ्यांचा उत्साह आणि प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या उपस्थितीतून जाणवला. खजूर पीक लागवडीतून निश्चितच जळगाव जामोद पट्टा मधील शेतकऱ्यांना नाव संजीवनी मिळणार आहे आणि माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून पारंपारिक पिकांना बगल देऊन नवीन तंत्रज्ञान व नवीन पिके शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये घेऊन त्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये कसा हातभार लावता येईल हा आमदार हे माननीय आमदार साहेबांचे विजन  आणि त्या माध्यमातूनच तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद तथा संग्रामपूर या दोन्ही तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला, सदर कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाची रूपरेषा नवनियुक्त तालुका कृषी अधिकारी श्री रमेश जाधव यांनी ठरवली आणि त्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे कृषी विभागा खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी त्यांच्या वक्तव्यांमधून सुतवाच केले व खजूर लागवड व त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कशी आर्थिक समृद्धता आणता येईल याबाबत त्यांनी आपले विचार व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप कृषी अधिकारी श्रीकृष्ण शिंदे यांनी पार पाडले तथा कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी संग्रामपूर तथा जळगाव जामोद येथील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी तथा उप कृषी अधिकारी , सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेऊन नियोजन केले.

Previous Post Next Post