जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या वतीने जागतिक नशामुक्ती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना नशा मुक्तीची शपथ देवून मार्गदर्शन...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जागतिक स्तरावर, "जागतिक नशा मुक्ती दिन" "आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन" दिनांक २६ जून रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या वतीने नशा मुक्ती ची शपथ तसेच स्थानिक दि.न्यु.ईरा महाविद्यालयात साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पीएसआय राजकुमार कांबळे यांनी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहिल्याने होणारे फायदे याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम तसेच निरोगी जीवनशैली कशी जगायची तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवून समस्यांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित कशा पद्धतीने करावयाची याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले.दि.न्युईरा महाविद्यालयातील कार्यक्रमाला जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पीएसआय राजकुमार कांबळे, पीएसआय प्रशांत झेडगे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेळके, महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी उपस्थित होते.तसेच पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांनी पोलीस स्टेशन ला कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना नशा मुक्ती ची शपथ दिली यावेळी पीएसआय नारायण सरकटे, अमोल पंडित,एसआय विनोद गायकवाड,पो.हे.काँ उमेश शेगोकार,ग्यानसिंग राठोड, गजानन सातव, अतुल मोहाळे,कात्रे,पोलीस कॉन्स्टेबल मंगेश सोळंके, सागर तांदळे, मधुकर गाढे,अमोल नंदाने,झाल्टे, रणजीत भिसे, अयुब शेख, मधुकर गाढे यांचेसह डि.बी चे हेडकॉन्स्टेबल पवार उपस्थिती होते.
