बापुमिया सिराजोद्दीन पटेल कनिष्ठ महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी...


 
बापुमिया सिराजोद्दीन पटेल कनिष्ठ महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज  यांची जयंती साजरी...

जळगांव जामोद प्रतिनिधी...

पिंपळगाव काळे येथील बापुमिया सिराजोद्दीन  पटेल  कला, वाणिज्य व विज्ञान  कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष मा.ॲड.सलीमजी पटेल, सहसचिव श्री रब्बानी देशमुख,संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. कय्युमजी पटेल,तथा सिराजोद्दीन पटेल यांच्या मार्गदर्शनात दि 26 जून 2025 रोजी राजर्षी  शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.त्याच बरोबर सामाजिक न्याय दिवस सुद्धा साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अॅड.सलीमजी पटेल होते.कार्यक्रमासाठी मंचावर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मुकूंद इंगळे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शेख फराह मॅडम,मुख्याध्यापक अजित तडवी, हज्जन जैतुनबी बापूमिया पटेल डे कॉलेज चे प्राचार्य प्रा. मो.शोएब , कॉन्व्हेन्ट च्या प्र.प्राचार्या धांडे मॅडम यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष अॅड.सलीमजी पटेल व मान्यवर यांचे शुभ हस्ते राजर्षी शाहू महाराज व बापूमिया सिराजोद्दीन पटेल गुरुजी उपाख्य भाऊसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य मुकूंद इंगळे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याची माहिती देऊन 1918 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी बोलाविलेल्या खामगाव येथील शिक्षण परिषदेमध्ये  सिराजोद्दीन बापूमीया पटेल गुरुजी यांनी शाहू महाराज यांच्या आवाहनाला साथ देत शैक्षणिक कार्यासाठी भरीव देणगी दिली.या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.आपल्या अध्यक्षीय मनोगतातून अॅड.सलीमजी पटेल यांनी राजर्षी शाहू महाराजांचे कार्य अतिशय महान असुन विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी स्वातीची प्रगती करायची असेल तर मोबाईल पासून लांब राहावे असे आवाहन केले. उत्कृष्ट शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचा विश्वास सार्थ करावा त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना सुसज्ज ग्रंथालय, ई लायब्ररी, अटल टिंकरिंग लॅब या सारख्या अनेक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहोत असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदीप गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ आनंद जाधव यांनी केले.कार्यक्रमासाठी महाविद्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post Next Post