पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त शिक्षकास लाखोंचा गंडा...जळगाव शहरातील घटना...


💥पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त शिक्षकास लाखोंचा गंडा...जळगाव शहरातील घटना...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद शहरामध्ये तसेच तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक घटना जळगाव जामोद शहरातील विद्यानगर कॉलनी जवळ दिनांक २४ जुन रोजी सकाळी ७:३० च्या दरम्यान घडली शहरातीलच बुऱ्हानपूर रोडलगत असलेल्या गजानन महाराज मंदिरातुन दर्शन करून आलेल्या एका सेवानिवृत्त ६१ वर्षीय शिक्षकास दोन अज्ञात लुटारूंनी २ लाख ३४ हजार रुपयांनी चुना लावला त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ५० ग्रॅम व सोन्याची अंगठी ८ ग्रॅम किंमत अंदाजे २ लाख ३४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने ठगल्याची धक्कादायक घटना घडली असून घटनेची तक्रार सेवानिवृत्त शिक्षक गजानन मानस्कर वय ६१ वर्ष राहणार विद्यानगर कॉलनी जळगाव जामोद यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली आहे. सेवानिवृत्त शिक्षक गजानन मानस्कर हे दररोज सकाळी गजानन महाराज मंदिरात दर्शनाकरिता जात असतात ते दिनांक २४ जून रोजी दर्शन करून परत येत असताना जळगाव जामोद शहरातीलच त्रिमूर्ती प्लायवुड्स जवळ आले असता अज्ञात दोन २२ ते २५ वर्षीय तरुण मोटरसायकलने त्यांच्या जवळ आले व त्यांना म्हणाले शहरांमध्ये चोरीचा घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून येथे बाजूलाच एक चोरीची घटना घडली असून आम्ही चोरांचा शोध घेत आहोत परंतु तुम्ही गळ्यामध्ये सोन्याची मोठी चैन व हात बोटात अंगठी घालून कोठे फिरत आहात, तुमच्या जवळील सोन्याच्या वस्तू काढून खिशामध्ये ठेवा यावेळी फिर्यादी गजानन मानस्कर यांनी गळ्यातील चैन व हातातील अंगठी खिशामध्ये टाकली यावेळी त्यांनी त्यांच्या जवळी रुमाल देत तुमच्या जवळील सोन्याच्या वस्तू रुमाला ठेवून खिशात ठेवा असे म्हणून सोन्याचे दागिने घेतले व रुमाल बांधून खिशात ठेवण्याकरिता दिला व ते दोन तरुण मोटरसायकल घेऊन बुऱ्हानपूर रोड कडे निघून गेले.यावेळी गजानन मानस्कर यांनी खिशातील रुमाल काढून बघितला असता त्यामध्ये त्यांना सोन्याची चैन व अंगठी दिसली नाही त्या जागी दोन दगड दिसले त्यामुळे त्यांच्या लक्षात आले की त्या दोन तरुणांनी पोलीस असल्याची बतावणी करून दागिने पळविले. हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी पोलीस स्टेशनला ठेवून घटनेची तक्रार दिली तसेच त्या दोन्हीही चोरट्यांचे वर्णन त्यांनी सांगितले निवृत्त शिक्षक गजानन मानस्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोन तरुण चोरट्यांविरोधात भारतीय न्याय समितीच्या कलम ३१८(४)२०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजकुमार कांबळे करीत आहेत.

Previous Post Next Post