लोकोपयोगी योजनांच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न..आ.डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते पाच ब्रास मोफत वाळू रॉयल्टी पासेस वाटप...


 
लोकोपयोगी योजनांच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न..आ.डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते पाच ब्रास मोफत वाळू रॉयल्टी पासेस वाटप...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक २४ जून रोजी विविध लोकोपयोगी योजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडले. यामध्ये राज्य शासनाने घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला असून त्यामध्ये घरकुल लाभार्थ्याला ५ ब्रास रेती मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील घरकुल पात्र लाभार्थ्यांना घर बांधकामा करिता प्रति लाभार्थी यांना ५ ब्रास मोफत रेती देण्याच्या रॉयल्टी पासेस वाटप करण्यात आल्या असून तालुक्यातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत रेतीचे वाटप यापुढेही करण्यात येणार आहे.तसेच या आढावा बैठकीत जळगाव जामोद उपविभागातील सहाय्यक निबंधक व सर्व बँक व्यवस्थापकांच्या सन २०२५-२६  या आर्थिक वर्षात खरीप हंगाम, पिक कर्ज वाटपा बाबत देण्यात आलेले लक्षांक झालेले कर्ज वाटप, प्रलंबीत कर्ज वाटप याबाबत आढावा घेवुन प्राप्त लक्षांकाची १०० टक्के पुर्तता करण्याबाबत व शेतक-यांना तात्काळ पिक कर्ज वाटप करण्या संबंधीचा सहाय्यक निबंधक व बँक व्यवस्थापकांच्या कार्याचा आढावा घेवुन सर्वांना सुचनाही यावेळी देण्यात आल्या.या आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी जळगाव जा,जळगांव जामोद तहसिलदार पवन पाटील, संग्रामपुर  तहसिलदार प्रशांत पाटील , शेगाव तहसिलदार,गट विकास अधिकारी जळगाव जा. संदीपकुमार मोरे, यांचेसह संग्रामपुर व शेगाव गटविकास अधिकारी तसेच लिड बँकेचे व्यवस्थापक, सर्व सहाय्यक निबंधक तसेच सर्व बँकेचे व्यवस्थापक यावेळी उपस्थित होते.

Previous Post Next Post