पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून घातपातच..... सीआयडी चौकशीची प्रसेनजीत पाटील यांची मागणी..पंकज देशमुख यांना न्याय मिळवुन दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.. राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रसेंनजित पाटील...
जळगाव (जामोद) प्रतिनिधी:-
गेल्या एक महिन्यापूर्वी ३ मे रोजी शहरातील भाजपा कार्यकर्ते आणि शासकीय कंत्राटदार पंकज देशमुख यांचा मृत्यू ही पोलिसांनी आत्महत्या दाखवलेली आहे. पंकज देशमुख यांची आत्महत्या झाली त्या स्थळाची परिस्थिती पाहता आणि पंकज देशमुख यांच्या शरीरावरील जखमा, त्याची मोडलेली बोटे आणि त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलेली तक्रार या सर्व बाबी पाहता ती आत्महत्या नसून घातपातच आहे. सदर प्रकरणाचा तपास हा पोलीस दबावाखाली आणि चुकीच्या दिशेने करीत आहेत. ह्या प्रकरणात सुनीता पंकज देशमुख यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्या दृष्टीने तपास करावा आणि सीआयडी मार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाला आंदोलन करावे लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती प्रसेनजीत पाटील यांनी दिला. पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुनीता देशमुख यांची सात्वनपर भेट घेतल्यानंतर स्थानिक बाजार समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते 3 जून रोजी बोलत होते.पंकज देशमुख फार हलाखीच्या परिस्थितीतून गेलेला आहे.. त्याने वाईट दिवस पण अनुभवले आहेत, आज त्याची कोट्यावधी रुपयाची ठेकेदारी आहे... तो एक धाडसी व्यक्ती होता. तो आत्महत्या करू शकत नाही असे माझ्यासह सर्व त्याच्या मित्र परिवाराचे पण म्हणणे आहे. तो आणि त्याची पत्नी साध्या पद्धतीने जीवन जगत होते .कुठलाही अवास्तव खर्च नाही लवाजमा नाही असा तो एक धाडसी व्यक्ती होता.. पंकजच्या निधनाने संपूर्ण कुटुंबाचा आधार गेला. त्याचे मागे त्याची पत्नी लहान मुलगा व मुलगी आहे.... संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे त्यामुळे ह्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडी ह्या उच्चस्तरीय यंत्रणे मार्फत करावा व सुनीता देशमुख ला न्याय द्यावा असेही ह्यावेळी प्रसेनजीत पाटील म्हणाले.ठाणेदार श्रीकांत निचड हे आपल्याला योग्य ती माहिती देत नाहीत असे सुनीता देशमुख यांचे म्हणणे आहे. मृतकाची पत्नी वारंवार मागणी करत आहे की घातपाताच्या दिशेने तपास करावा तरीही ठाणेदार त्या दिशेने तपास करीत नाही. स्थानिक पोलीस यंत्रणेवर मृतकाच्या पत्नीचा विश्वास नाही. पंकज देशमुख कधीही गळ्यामध्ये दुपट्ट किंवा रुमाल घालत नव्हता असे अनेकांचे म्हणणे आहे? मग आत्महत्येच्या दिवशी त्याच्या गळ्यामध्ये दुपट्टे अथवा रुमाल कसा? असे बरेच प्रश्न सुद्धा अनुत्तरीत आहेत. म्हणून पोलिसांनी सुनीता देशमुख यांना सहकार्य करावे आणि हा तपास वरिष्ठ पातळीवर सीआयडी कडे सोपवावा यासाठी आपण उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना भेटणार असून सुनिता देशमुख हिला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी सांगितले. गत काही दिवसापासून पंकज देशमुख च्या सोबत कोण होते त्याचे कुणाशी वाद झाले का. या सर्व बाबी सुद्धा नजर अंदाज केल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जे सोबत येतील ते त्यांना सोबत घेऊन आपल्याला आंदोलन करावे लागेल. आज पंकज देशमुख आहे उद्याच्या काळात पंकज देशमुख सारखी अवस्था कुण्या कार्यकर्त्यावर येऊ नये त्यासाठी त्याला न्याय मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असे पण ते म्हणाले.