चिखलदरा पंचायत समिती कार्यालय व तालुका आरोग्य अंतर्गत तसेच सर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे कार्यक्रम संपन्न...एकुण ५३ लोकांनी रक्तदान केले...


चिखलदरा पंचायत समिती कार्यालय व तालुका आरोग्य अंतर्गत तसेच सर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे कार्यक्रम संपन्न...एकुण ५३ लोकांनी रक्तदान केले...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

रुग्णांना रक्त कमी पडू नये म्हणून अनेक संस्था कडुन तसेच शासकीय कार्यालये कडून रक्तदान चा शिबिर सुरू असते अशा शिबिरात पुष्कळ रक्तदाता रक्तदान करत असल्याचे चित्र दिसून येत.त्याच प्रमाणे गटविकास अधिकारी पंचायत समिती चिखलदरा जि.अमरावती चे विद्यमाने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंती निमित्त दि. १६/६/२०२५ ला जागतिक रक्तदान दिन व २१ जुन जागतिक योगदिन सप्ताहाचे अनुषंगाने रक्तदान शिबिरांचे आयोजन चिखलदरा पंचायत समिती येथे करण्यात आले होते.या शिबिरात एकुण ५३ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले असल्याचे दिसून आले आहे.या रक्तदान शिबिराचे आयोजन श्री.शिवशंकर भारसाकडे साहेब (गटविकास अधिकारी चिखलदरा ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आहे.या रक्तदान शिबिरांत तालुका आरोग्य अधिकारी तसेच पंचायत समिती चिखलदरा येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांचा पण मोलाचा वाटा राहिला आहे.

Previous Post Next Post