धरती आबा जनजातीय उत्कर्ष अभियान अंतर्गत आदिवासी ग्राम निमखेडी येथे आढावा बैठक...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
धरती आबा जनजातीय उत्कर्ष अभियान अंतर्गत जळगाव जामोद तालुक्यातील दत्तक ग्राम निमखेडी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे आज दिनांक 19 जून 2025 गुरुवार रोजी स्थानिक सर्व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक पालक अधिकारी तथा तहसीलदार पवन पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. प्रथमतः स्थानिक जिल्हा परिषद शाळा तथा अंगणवाडीची पाहणी करण्यात आली ,तसेच उपस्थित कर्मचाऱ्याकडून जवळपास 29 योजनांचा आढावा घेऊन सविस्तर मार्गदर्शन तहसीलदार यांनी केले.तसेच योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.सभेला रसूलपुर गट ग्रामपंचायत चे सरपंच राजूभाऊ ,उपसरपंच रवी बिबोकार, जि प म प्रा शाळेचे मुख्याध्यापक उमेश खारोडे ,शिक्षक उमेश भड , अंगणवाडी सेविका रेखा वडणेरकर, ममता सस्त्या , सौ चोंगड ,तसेच मंडल अधिकारी राठोड ,ग्राम महसूल अधिकारी सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी शिंदे , आशा वर्कर सुनीता जमरा , वन समिति अध्यक्ष सुकलाल पानेकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश बिबोकार ,रोजगार सेवक उमेश इंगळे ,महसूल सेवक श्री डावर उपस्थित होते.प्रसंगी स्थानिक जिल्हा परिषद शाळेतील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रासाठी शालेय पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सभेच्या शेवटी मुख्याध्यापक उमेश खारोडे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.