प्रभाग रचना समितीने ५०लाख खंडणी घेऊन जनतेची व निवडणूक आयोगाची केली दिशाभूल माजी नगराध्यक्ष गजानन वाघ यांचा आरोप..२०१७ नुसार प्रभाग रचना करा अन्यथा आत्मदहनाचा इशारा...


 
प्रभाग रचना समितीने ५०लाख खंडणी घेऊन जनतेची व निवडणूक आयोगाची केली दिशाभूल मा. नगराध्यक्ष गजानन वाघ यांचा आरोप..२०१७ नुसार प्रभाग रचना करा अन्यथा आत्मदहनाचा इशारा...

 जळगाव(जामोद) प्रतिनिधी:-

आगामी काळात नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या असुन.निवडणूक आयोगाने २०१७ च्या प्रभाग व आरक्षणा नुसार नव्याने प्रभाग रचना कराव्यात अशा सुचना केल्या असून. २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार सत्ताधारी पक्षाला ५०%च मते मिळाली होती. त्यामुळे त्यांनी समिती प्रमुख आणि मुख्याधिकाऱ्यांवर दबाव आणून २०१७ ची प्रभाग रचना व आरक्षण गाह्य न धरता सत्ताधाऱ्यांच्या दबावात ५० लाख रुपये खंडणी घेऊन २०२२ ची प्रभाग रचना व आरक्षण;कायम ठेवून  निवडणूक आयोगाला सादर केले आहे. प्रभाग रचना समिती प्रमुख व इतर चार सदस्यांनी जळगाव शहरांमध्ये कुठेही न फिरता संबंधित कार्यालयात बसून नवी प्रभाग रचना सादर केली असून ती प्रभाग रचना आम्हाला मान्य नाही तर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नव्याने प्रभाग रचना करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी तसेच माजी सदस्य ,माजी नगराध्यक्षांनी वारंवार करून सुद्धा संबंधित समिती प्रमुखांनी आणि मुख्याधिकारी यांनी ही मान्य केलेले नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार २०१७ ग्राह्य धरून प्रभाग रचना व आरक्षण करावे अन्यथा आपण २८ जून रोजी मुख्याधिकारी यांचे कार्यालयात अथवा नगरपरिषद परिसरात आत्मदहन करू असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ यांनी मुख्याधिकारी यांना दिनांक २५ जून रोजी दिला आहे. सदर निवेदन देतेवेळी , काँग्रेस शहर अध्यक्ष अर्जुन घोलप,शिवसेना मतदार संघ प्रमुख भिमराव पाटील, शहर शिवसेनाप्रमुख रमेश ताडे यांची उपस्थिती होती.सदर निवेदनाच्या प्रती राज्य निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार तथा वरिष्ठांना सुद्धा तक्रारीच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

Previous Post Next Post