नामदेव इंगळे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार...


 
नामदेव इंगळे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार...

प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

नामदेव तुळशीराम इंगळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नामदेव इंगळे हे मूळचे अकोला जिल्ह्याचे रहिवासी असून हिवरखेड ता.तेल्हारा हे त्यांचे मूळ गाव आहे. सध्या ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत. इंगळे यांचे एम कॉम पर्यंत शिक्षण शिवाजी कॉलेज अकोला येथे झाले आहे. लेखा नियंत्रक ऑफिसर्स पुणे येथे ऑडिटर म्हणून नोकरीत रुजू झाल्यानंतर सुद्धा त्यांनी समाज कार्य सोडले नाही. त्यांच्या पत्नी निवृत्त शिक्षिका यांनी सुद्धा त्यांना मोलाची साथ दिली. त्यामुळे समाज कार्य करतांना ऊर्जा मिळायची असे नामदेव इंगळे म्हणाले. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Previous Post Next Post