वंचित बहुजन आघाडीचे शेतकऱ्यांच्या बी बियाणे खते आणि पिक विमा संदर्भात निवेदन...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
वंचित बहुजन आघाडी शाखा जळगाव जामोद च्या वतीने व नवनियुक्त तालुका अध्यक्ष माजी लोकनियुक्त सरपंच रमेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये तालुका कृषी कार्यालय जळगाव जामोद येथे आज दिनांक 16 जुन रोजी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.सदर निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा, बुलढाणा जिल्हा कृषी अधिकारी साहेब व तहसीलदार साहेब जळगाव जामोद यांना देण्यात आल्या.
शेतकरी बांधवांची पिळवणूक होऊ नये याकरिता निवेदनात खालील महत्वाचे मुद्दे...
1. बी बियाणे तात्काळ वाटप करणे बाबत
2. कृषी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना शासनाच्या ध्येय धोरणानुसार ठरलेल्या भावानुसार खते मिळणे बाबत
3. शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा रक्कम तात्काळ जमा करणे बाबत
4. सन 2022 23 24 या तिन्ही वर्षाचा उर्वरित पीक विमा कंपनीने 25% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अदा केली परंतु उर्वरित 75 टक्के रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली नाही ती तात्काळ जमा करणे बाबत
5. बोगस बी बियाणे असलेल्या कृषी केंद्रावर तात्काळ कारवाई करणे बाबत
6. शेतकरी बांधवांना ठरलेल्या एक रुपयांमध्ये पिक विमा काढण्यात यावा.
वरील सर्व बाबी ह्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या आहेत. याबाबतीत शेतकऱ्यांची पिळवणूक झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष रमेश नाईक, ज्येष्ठ नेते साहेबराव भगत, तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई सर, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर, जिल्हा उपाध्यक्ष विजय तायडे, तालुका महासचिव भागवत पाटील जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी पार्वताबाई इंगळे, ज्येष्ठ नेते बाबूरामजी तायडे, युवा तालुका अध्यक्ष राजरत्न वाकोडे, शहराध्यक्ष आझम कुरेशी, युवा शहराध्यक्ष प्रवीण तायडे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सुनिता ताई हेरोडे, जिल्हा सदस्य स्वप्निल गवई, तालुका उपाध्यक्ष असमत खान, मीडिया प्रमुख रवींद्र जाधव, राजेश तायडे जयकुमार डोंगरदिवे,प्रकाश जवंजाळ आनंदा गवई प्रवीण कडू तायडे, भास्कर जुमडे, अमोल तायडे, ज्ञानेश्वर कोकाटे, प्रदीप वानखडे सुदाम गवई यांचेसह वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी शहरा आघाडी महिला आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.