"शेतकऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही!" –राष्ट्रवादीचे नेते प्रसेंनजित उर्ब बाळासाहेब पाटील यांचा बबनराव लोणीकर यांना इशारा...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेनजित उर्फ बाळासाहेब पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.बाळासाहेब पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत संतप्त प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी म्हटलं आहे की,"शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्याबद्दल बोलताना जर काही नेते अशी हलकट, गर्विष्ठ भाषा वापरत असतील, तर ती अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. लोणीकर ज्या पद्धतीने 'पैसे दिले' अशा थाटात बोलत आहेत, जणू त्यांच्या खिशातून वाटले आहेत, ही अत्यंत विकृत मानसिकता दर्शवते."ते पुढे म्हणाले,
"भाजपातील अनेक नेत्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांबद्दल अवमानकारक शब्द वापरत आले आहेत. आता लोणीकर यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत. आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत, कुठल्याही पक्षात असो – तुला सोडणार नाही. तू सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहेस, पण आता मलिदा खाऊन तुला शेतीची गरज वाटत नाही म्हणून अशी भाषा करतोस."यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही उद्देशून प्रश्न उपस्थित केला."तुम्ही लोणीकर यांना काय समज देत आहात? अशी भाषा सहन करायची का? जर तुमचं शेतकऱ्यांवर प्रेम असेल तर त्याच्यावर कारवाई करा आणि पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवा."शेवटी बाळासाहेब पाटील यांनी लोणीकर यांना थेट इशारा दिला –"यानंतर जर शेतकऱ्यांबद्दल अशी वाईट भाषा केलीस, तर तुला माफ केलं जाणार नाही!"
