वादग्रस्त लेआउट रद्द करण्याची किस्मत खान यांची आक्रमक मागणी...एसडीओ मनोज लोणारकर यांच्याकडून तारीख पे तारीख राजेश लखोटिया यांच्या वकिलांचे वकीलपत्र दाखल...


 
वादग्रस्त लेआउट रद्द करण्याची किस्मत खान यांची आक्रमक मागणी...एसडीओ मनोज लोणारकर यांच्याकडून तारीख पे तारीख राजेश लखोटिया यांच्या वकिलांचे वकीलपत्र दाखल...

सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी....

अकोट शहरांमधील नामांकित असलेले बिल्डर राजेश लखोटिया यांच्या नावे असलेले अकोट पोपटखेड रोडवर वादग्रस्त लेआउट रद्द करण्याची आक्रमक मागणी किस्मत खान यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टात केली आहे.अकोट पोपटखेड रोडवरील ग्रामपंचायत मोहाळा हद्दीतील लखमापूर शिवारातील गट नंबर 45 व गट नंबर ३७ या लेआउट क्षेत्रफळाची फेरचौकशी प्रकरण उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांच्या समोर किस्मत खान यांनी दाखल केले आहे या प्रकरणाची प्रथम सुनावणी 30 मे रोजी झाली होती परंतु या प्रकरणांमध्ये असलेले पाच गैरअर्जदार पैकी कोणीही हजर झाले नसून पुढील तारीख 18 जून देण्यात आली होती त्यामध्ये काल लेआउट धारक राजेश लखोटिया हजर झाले असून त्यांनी वकिलांचे वकीलपत्र दाखल करून पुढील तारीख देण्याची विनंती केली असता सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लखोटिया यांना बाजू मांडण्यासाठी एसडीओ लोणारकर कडून ४ जुलै ही तारीख देण्यात आली या प्रकरणांमध्ये आणखी चार नामांकित व्यापारी, शाळा तथा बँक संचालक यांचा समावेश असून त्यांनी मात्र काल झालेल्या सुनावणी मध्ये दांडी मारल्याचे दिसून आले या लेआउट मध्ये  अनेक गैरप्रकार करून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार हा शासकीय अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच केल्या गेला आहे असा गंभीर आरोप किस्मत खान यांनी केला आहे त्यामुळे हे संवेदनशील प्रकरण अनेक नामांकित मंडळी सह शासकीय अधिकाऱ्यांना अडचणीत आणणारे ठरणार असल्याची चर्चा अकोट शहरात सर्वत्र सुरू झाली आहे.

_____________________________________________

सदर लेआउट मधील दोन गट नंबर जोडणारा रस्ता हा पूर्णपणे गैरकायदेशीर प्रक्रिया करून रद्द करण्यात आला तसेच नकाशा मधील ओपन स्पेस हा प्रत्यक्षात पूर्ण असल्याचा दिसत नाही असे अनेक गंभीर प्रकार या लेआउट मध्ये झालेले आहेत त्यामुळे हे लेआउट रद्द करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रकरण दाखल केलेले आहे 30 मे रोजीच्या सुनावणीमध्ये  गैरअर्जदार पैकी कोणीही हजर झालेले नव्हते परंतु काल झालेल्या सुनावणीमध्ये लेआउट धारक राजेश लखोटिया हजर असून त्यांच्या वकिलांचे वकीलपत्र दाखल करून त्यांनी एसडीओ यांना पुढील तारीख देण्याची विनंती केली असता ४ जुलै ही तारीख देण्यात आली सदर प्रकरणांमध्ये मी किस्मत खान यांचे वकील म्हणून काम पाहिले

अॅड फाजील पटेल 

ज्येष्ठविधीज्ञ अकोट

Previous Post Next Post