जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'पर्यावरण मित्र' आणि वन विभाग, जळगाव जामोद यांचा संयुक्त उपक्रम – पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले...


 
💥जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'पर्यावरण मित्र' आणि वन विभाग, जळगाव जामोद यांचा संयुक्त उपक्रम – पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘पर्यावरण मित्र, जळगाव जामोद’ आणि जळगाव जामोद वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी आणि कृतीशील उपक्रम उत्साहात पार पडला.या उपक्रमामागे संकल्पना होती पर्यावरण मित्र प्रसेनजित मिश्रा यांची, आणि त्यांनीच या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले.प्रमुख मंचावर वनपाल श्री. अतुल बडगुजर साहेब आणि पर्यावरण मित्र रघुनाथ कौलकार सर उपस्थित होते.या उपक्रमाला स्थानिक रेंज फॉरेस्ट ऑफिसर (RFO) निलेश काळे सर यांचेही विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण उपक्रम अधिक प्रभावी व सुसंगतपणे पार पडला.कार्यक्रमात सहभागी झालेले पर्यावरण मित्र – चतुर्भुज केला, शरद जाधव, राजेश भिवटे सर, आमले सर, सुनील भगत, डॉ. सतीश शिरेकार, प्रकाश जाधव मानकर जी, सुनील माटे – यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.वन विभागाच्या वतीने वनरक्षक वी. पी. गव्हाणे, ए. पी. हिवाळे, धवसे साहेब, बारगीर साहेब, वनरक्षक रूपाली राऊत मॅडम, वैशाली जावळे मॅडम, साखरे साहेब, सादिक सुरूकणे साहेब, वनरक्षक योगेश गावंडे, सतीश साळवे वनरक्षक हे अधिकारी उपस्थित होते.

उपक्रमाची वैशिष्ट्ये:-

 ७-८ प्रकारच्या स्थानिक जातींच्या झाडांचे ५० पेक्षा अधिक वृक्षारोपण. पक्ष्यांसाठी घरटी व पाणीपात्रांचे बसविणे व वाटप.पर्यावरण मित्र श्री. गिरजापुरे यांनी तयार केलेले सीड बॉल्स जंगलात योग्य ठिकाणी टाकणे. विषारी कोब्रा जातीचा साप वन विभागाच्या सहकार्याने जंगलात सुरक्षितरीत्या सोडण्यात आला. जंगल परिसरातील प्लास्टिक व काच सामग्री संकलन करून त्यांची योग्य विल्हेवाट या उपक्रमाने पर्यावरणप्रेम, जनसहभाग, आणि कृतीशीलता यांचा आदर्श निर्माण केला. सहभागी प्रत्येक पर्यावरण मित्राने पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.

Previous Post Next Post