खामगाव येथील सामाजिक कार्यकर्ते देविदास शर्मा राष्ट्रीय महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
पहेलवान सुभाषदादा पाटील युध फौंडेशन महाराष्ट्र राज्य संचालित कोल्हापूर द्वारा आयोजित ' राष्ट्रीय महाराष्ट्र भुषण पुरस्कार 2025 ' साठी खामगाव येथील सतिफैल भागातील देविदास शर्मा यांची निवड करण्यात आली होती सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा ठसा प्रभावीपणे लक्षात आला या कार्यासाठी देविदास शर्मा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.पै सुभाष दादा पाटील युध फौंडेशन कोल्हापूर व्दारे आयोजित सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कारनगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी राष्ट्रीय महाराष्ट्र भुषण पुरस्कार चे आयोजन करण्यात येते यामध्ये विविध क्षेत्रात कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यामध्ये पुरस्कार 2025 साठी खामगाव येथील सतिफैल भागातील सामाजिक कार्यकर्ते. धर्म सेवक धार्मिक क्षेत्रात भरीव योगदान वेळ देणारे श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे 25 वर्षाचे सेवा कार्य पाहून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार ८ जून २०२५ रोजी आदमपुर येथील श्री बाळुमामा मंदिरातील देवस्थान हॉल कोल्हापूर येथे एका भव्य दिव्य राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते देविदास शर्मा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार केवळ एक वैयक्तिक गौरव नव्हे तर खामगाव तालुक्या सह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी व विशेष सतिफैल भागासाठी अभिमानास्पद घटना आहे मागील 25 वर्षापासून धर्म सेवा. गरीब व वंचित समाजहितासाठी सामाजिक उपक्रम लोकशाही मुल्यात रूजवणाऱ्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत त्यांच्या कार्याचा केंद्र बिंदू नेहमी मानव सेवा सामाजिक क्षेत्रात गरीबांसाठी अन्नदान ब्लॅकेट वाटप पक्ष्यां साठी पाणी पात्र वाटप असे अनेक उपक्रम वर्ष भर देविदास शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळ राबवित असते त्यांचे उपक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत देविदास शर्मा यांना मानाचा फेटा घालून प्रसस्ती पत्र. शिल्ड. बुके देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी युथ फाऊंडेशन चे अध्यक्ष पैलवान सुभाष दादा पाटील. ब्रंच पोस्ट मास्तर रंगराव पाटील. इन्स्पेक्टर धर्मदाय कार्यालय कोल्हापूर कार्याध्यक्ष बाळुमामा देवालय आदमापुर मा सौ रागिनी खडके. पं समिती सभापती राणी गुरव.रयत विद्यार्थी विचार मंच जिल्हा कार्याध्यक्ष मा सौ वैशाली झांजगे . युवराज मिरजकर सर. सावित्रीबाई महिला बहु उद्देशिय. मानव सुरक्षा सेवा समिती अध्यक्ष अनिता रावण . यशराज महिला मंच अध्यक्ष नंदाताई विभुते. व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते या सर्व प्रमुख पाहुणे च्या हस्ते स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.