डी एस लहाने यांच्या नेतृत्वात 100 कार्यकर्त्याचा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश...


डी एस लहाने यांच्या नेतृत्वात 100 कार्यकर्त्याचा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारणाला प्राधान्य देणारे शिवसेना जिल्हा समन्वयक  प्रा. डी एस लहाने यांचा नेतृत्वात आज शेकडो शिवसैनिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये प्रवेश केला.मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पक्षप्रमुखांनी हातावर शिवबंधन बांधून पक्ष कार्यासाठी ताकदीने पुढे येण्याचे आवाहन केले.बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रा. डी एस लहाने यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून आपला परिचय दिला आहे. सध्या ते शिवसेनेचे जिल्हा समन्वयक असून त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. दोन दिवसापासून हे शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले होते. मातोश्री येथे दुपारची वेळ देण्यात आली होती. या वेळेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्वांशी संवाद साधला. त्यांनी डी एस लहाने सरांच्या कार्याचे कौतुकही केले.यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, प्रदेश प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, आ.सिद्धार्थ खरात आदी उपस्थितीत होते. डी एस लहाने यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार उर्फ बबलू शेठ माजी उपसभापती पंचायत समिती बुलढाणा ,समाधान जाधव, धोंडोबा गायकवाड, प्रमोद कळस्कर, श्रीकृष्ण मापारी, मनोज वानखेडे, त्यांच्यासह चार पंचायत समिती सदस्य, आजी माजी सरपंच,उपसरपंच ,आजी-माजी  ग्रामपंचायत सदस्य, बाजार समितीचे माजी संचालक निंबाजी काळवाघे ,ग्रामसेवक सोसायटीचे माजी अध्यक्ष अशा मतदारसंघातील 100 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेना ऊ बा ठा पक्षात प्रवेश घेतला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे कौतुक करून बुलढाणा जिल्ह्यात पक्ष वाढवण्याच्या सूचना केल्या.

Previous Post Next Post