आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात काँग्रेस कमिटीची बैठक...


 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात काँग्रेस कमिटीची बैठक...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

दिनांक 13 जुलै 2025 रोजी स्थानिक हॉटेल अथर्व रेस्टॉरंट येथे लोणार काँग्रेस कमिटीची बैठक येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात बैठक आयोजित केली होती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या सूचनेनुसार बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा मा.आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या आदेशाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात बैठक लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, तथा तालुकाध्यक्ष अश्रू फुके यांनी बैठक आयोजित केली होती या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ, माजी जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाटोळे, बुलढाणा जिल्हा सोशल मीडियाचे अध्यक्ष  श्लोकानंद डांगे,माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चिभडे, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी,ज्येष्ठ नेते प्रदीप संचेती, संजय राठोड, उपस्थित होते.यावेळी प्रकाश पाटील यांनी सांगितले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे याकरिता आज पासून जोमाने कामाला लागा व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर व नगरपरिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवा तसेच  या बैठकीत काँग्रेसची सभासद नोंदणी जास्तीत जास्त प्रकारे करण्यात यावी येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद , पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सभासद नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारचे मार्गदर्शन प्रकाश धुमाळ यांनी केले या बैठकीला अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तोफिक कुरेशी, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष सोनूने, माजी सरपंच सालिक पाटील, माजी सरपंच पंजाब पन्हाळ, माजी नगरसेवक प्राध्यापक सुदन कांबळे, माजी नगरसेवक पंढरी चाटे,  माझी नगरसेवक सतीश राठोड, भरत राठोड, एडवोकेट गजानन लांडगे, माजी नगरसेवक शेख करामत,माजी नगरसेवक शंकर हेंद्रे, दौलत मानकर, माजी नगरसेवक शेख असलम शेख कासम, शहर उपाध्यक्ष गजानन मापारी, मजेद कुरेशी, आनंद पाटोळे, सरचिटणीस फैयाज खान, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अमोल सोनवणे, शहराध्यक्ष विकास मोरे, शेख अफसर शेख तुराब, एजाज खान, रहमान नवरंगवादी,मीडिया शहराध्यक्ष मोहसीन शहा, शेख सज्जाद शेख करामत,गजानन बाजार, जगन आघाव,वैभव पन्हाळ,  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.बैठकीचे सुत्रसंचालन प्राध्यापक गजानन खरात, प्रस्ताविक अश्रू फुके, आभार शेख समद  यांनी केले.

Previous Post Next Post