पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनींसाठी मोफत पास वितरण सोहळा संपन्न....
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी....
महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनींसाठी मोफत पास वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे,प्रमुख उपस्थिती संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे,प्रमुख उपस्थितीत तेल्हारा आगार प्रमुख मिथुन शर्मा,पोलीस पाटील प्रकाश गावंडे, वाहतूक नियंत्रक देविदास चतुरकार,विजय गवई,वैभव ठाकरे, पत्रकार सुरज चौबे, संतोष शर्मा,संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे,प्राचार्य संतोषकुमार राऊत, पर्यवेक्षक गणेश खानझोडे हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामीण भागातील बाहेरगावाहून येणाऱ्या पासधारक विद्यार्थिनींना मोफत पासेसचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी आगार प्रमुख मिथुन शर्मा यांनी महाराष्ट्र शासनाच्या राज्य परिवहन मंडळाच्या उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांसाठी पासेस शाळास्तरावर पोहचविल्याने मनस्वी आनंद झाल्याचे सांगितले. यावेळी संस्थाअध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून पासेस शाळास्तरावर मिळाल्याने विद्यार्थिनीच्या श्रम व वेळेची बचत झाल्याने संस्था या उपक्रमाचे स्वागत करीत असून संस्था शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या हितासाठी सहकार्य करण्यास सदैव कटिबंध असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे संचलन प्रा.डॉ.शंकर दुनघव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.स्नेहा शुक्ला यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा.चेतन चुने, प्रा.निलेश गिऱ्हे, प्रा.मयूर लहाने,अंबादास चाफे,निलेश दांडगे यांनी सहकार्य केले.
