आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकीच्या संदर्भात संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न..
जळगाव जामोद प्रतिनिधी......
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकीच्या अनुषंगाने डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांच्या अध्यक्षतेखाली संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीची बैठक वरवट बकाल येथे संपन्न झाली..सदर बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात या बैठकीत चर्चा झाली तसेच प्रत्येक गावातील समस्यांबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करणे प्रसंगी आंदोलन करणे अशा सूचना करण्यात आली..सदर बैठकीत डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सोशल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष श्लोकांनद डांगे,जेष्ठ नेते प्रकाश देशमुख, संतोष राजनकर,पठाण सर,तालुकाध्यक्ष सतीष टाकळकर, जगन्नाथ विश्वकर्मा गजानन ढगे,मुन्ना ठेकेदार,शामभाऊ डाबरे,संजय ढगे आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..