उत्कृष्ट सूत्रसंचालक तथा सुप्रसिद्ध व्हॉईस अँकर डॅशिंग पत्रकार किरणताई जाधव यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान
शिर्डी तालुका प्रतिनिधी:-
अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समिती व ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशन लघुउद्योग विकास संघटना पुरस्कार सोहळा 20 जून रोजी शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पा. खंडापूरकर बाबा यांच्या उपस्थित पार पडला.यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समिती वतीने सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र व शाल पुष्पगुच्छ देत सत्कार सन्मान करण्यात आला.यावेळी शिर्डी येथील नावाजलेले यू ट्यूब JD महाराष्ट्र NEWS चॅनलच्या संचालिका किरणताई जाधव यांना उत्कृष्ट पत्रकार २०२५-२६ पुरस्कार श्री.प्रदीप पा. खंडापूरकर बाबा, अँड.राणीताई स्वामी, सामाजिक कार्यकर्ते नाना शिंदे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन सौ.नयनाताई शिरसाठ, मनोज दुशिंग,रमेश साबळे, बाळासाहेब शिरसाठ, सायली बनसोडे, रुपाली मोलाचे, सुरेंद्र महाले, पंकज पाटील, बाबासाहेब पगारे, सौ.मायाताई आरणे यांनी केले होते.किरणताई जाधव यांना पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.