युवकाचा सर्प दंशामुळे मुत्यू... पातुर्डा येथील दु:खद घटना..
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा येथील वार्ड नं २ मधील रहिवासी अंदाजे २७ वर्षीय युवकाचा सर्पदंशामुळे मुत्यू झाल्याची घटना घडली मृतक युवकाचे नाव अमोल अजाबराव डिगे आहे. पातुर्डा येथील अल्पभुधारक शेतकरी अजाबराव डिगे कुटुंबासह राहतात शेतातुन काम संपल्याने डिगे कुटुंबाचे जेवण झाल्या नंतर झोपी गेले अमोल अजाबराव डिगे अंदाजे वय २७ वर्ष या युवक झोपेत असतांना अमोलच्या पायाला विषारी सर्पाने दंश केल्याने त्याच क्षणी अमोलने सर्पाला हाताने पकडून भितीवर फेकले सर्प खाली पडून पोतळी घुसला डिगे यांच्या शेजारी शेख बशीर यांनी सर्पाला मारून एका डब्यात बंद करून वैधकिय अधिकारी यांना ओळखता यावे व उपचार करणे सोईचे व्हावे योग्य निदान साठी सर्प सोबत घेऊन नातेवाईकांनी अमोलला उपचारासाठी अकोला येथे सर्वेपचार रूग्णालयात हलविले ४ दिवस डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात उपचारा साठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र अखेर ५ व्या दिवशी अमोलचा दुदैवी मुत्यू झाला श्वविच्छेदन झाल्या नंतर पातुर्डा येथे अंतसंस्कार करण्यात आले सर्प दंशामुळे युवकाचा मुत्यू झाल्याने डिगे कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळले असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मृतकच्या पश्चात आई वडिल ३ भाऊ , ५ बहिणी बराच आप्त परिवार आहे शासनाने गोपीनाथराव मुंडे योजने अंतर्गत डिगे कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मांगणी जनते कडून होत आहे...