आषाढी एकादशी"निमित्त दानापूर येथील सहकार विद्या मंदिर येथे"पालखी सोहळा संपन्न...
तेल्हारा तालुका प्रतिनिधी....
सहकार विद्या मंदिर दानापूर येथे "आषाढी एकादशी" दिनानिमित्त "पालखी सोहळा कार्यक्रम सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद ,वरवट बकाल ,दानापूर व पिंपळगाव काळे चे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला व सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद ,वरवट बकाल ,दानापूर व पिंपळगाव काळेच्या मुख्य संयोजिका व महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद जळगाव जामोद केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर स्वाती किशोर केला यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात पावली खेळत पालखी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून टाळांच्या गजरात पालखी मिरवणुकीत सहभाग घेतला. तसेच शाळेचे मुख्याध्यापक घायल सर, पर्यवेक्षिका गांधी मॅडम ,पर्यवेक्षिका कोरडे मॅडम यांनी विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेची पूजा केली. तसेच विद्यार्थ्यांनी पावली, फुगड्या व गोल रिंगण चा खेळ खेळल्या. तसेच गांधी मॅडम यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या विचारांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना सद्गुणशीलतेचा संदेश दिला.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिकता सांस्कृतिक वारसा आणि एकात्मिकेची भावना निर्माण झाली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षिका व शिक्षक व शिक्षकेत्तर सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.