केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिरातील प्रांगणात आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थी झाले विठू माऊलीच्या गजरात दंग..!!!
जळगांव जामोद प्रतिनिधी...
केला & छोरीया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोदचे अध्यक्ष आदरणीय डॉ. किशोरजी केला सर तसेच शाळेच्या मुख्यसंयोजिका डॉ. सौ. स्वातीताई किशोरजी केला मॅडम यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीनिमित्त शाळेमध्ये ग्रंथदिंडीचे तसेच विविध भक्तीपर गीतांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करत, वारकरी होऊन वारीत सभा घेतला टाळ, मृदुंग, भगवे झेंडे आणि अभंगाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमला.यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल-विठ्ठलाच्या गजरात ग्रंथदिंडी काढली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे घोषवाक्य बनविले होते. यात सामाजिक भान जपत पर्यावरणाविषयी विविध संदेश त्याचप्रमाणे वाचन, लेखनाचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व परावर्तित करणारे घोषवाक्यांचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या गजरात पावली, रिंगण, फुगडी, यांसारख्या वारीची संस्कृती जपणाऱ्या विविध खेळांचा विद्यार्थी, आदरणीय पालकांनी, तसेच शिक्षकांनी उत्स्फूर्त आनंद लुटला. तसेच इयत्ता तिसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्ती पर आधारित नृत्य सादर केले. विठ्ठलाची वेशभूषा कु.प्रज्ञा सिद्धार्थ पवार तर रुखामाई ची वेशभूषा कु. आर्या अनंता कटोले यांनी साकारली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय डॉ. श्री. किशोरजी केला सर, प्रमुख मार्गदर्शक डॉ. सौ स्वातीताई केला, प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे आधारस्तंभ आदरणीय काकाजी तसेच विशेष अतिथी म्हणून शाळेचा माजी विद्यार्थी शंतनु विनायक उगले, शाळेचे प्राचार्य. विनायकजी उमाळे सर, विनोद ईश्वर सर, राजेश लोहिया सर , पर्यवेक्षिका मनीषा म्हसाळ मॅडम , अरुणा व्यवहारे मॅडम, यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेचा माजी विद्यार्थी शंतनू विनायक उगले, याचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग दहावीच्या विद्यार्थिनी कु. अनन्या नितीन उमाळे, कु. पूर्वा गोपाल टावरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाधव मॅडम तर विठू माऊलीच्या भक्तीवर आधारित गीत, संगीत विषयाच्या शिक्षिका तायडे मॅडम, जवंजाळ मॅडम, सातव मॅडम यांनी म्हटले, तर आभार प्रदर्शन गायकी मॅडम यांनी केली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका शारदा अत्तरकार, शिवानी अवचार मॅडम, राठी सर, प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.