पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी... न्याय हक्क समितीने केली शासन व प्रशासनाची दशक्रिया.....
जळगाव (जामोद) प्रतिनिधी....
भाजपा कार्यकर्ते पंकज देशमुख यांच्या घातपात प्रकरणी गेल्या १० दिवसापासुन न्याय हक्क जनआंदोलन समितीच्या वतीने बेमुदत साखळी धरणे आंदोलन चालू होते. मृत्युला अडीच महीने झालेत तरी पोलिस प्रशांसन हलगर्जीपने वागत आहे, कुठलीच कार्यवाही झाली नाही. गेल्या दहा दिवसापासुन आंदोलन चालू असुन सुद्धा पोलिस प्रशांसन किंवा शासनाने कुठलीच दखल घेतल्या जात नाही. आंदोलन समितीचा आणि देशमुख कुटुंबाचा आता पोलिस प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे धरणे आंदोलनाच्या दहाव्या दिवशी दिनांक २३जुलै रोजी शासन व प्रशासनाची दशक्रिया करुन निषेध करण्यात आला. पुढील लढा हा न्यायालयात व रस्त्यावर लढण्याचे समितिच्या वतीने जाहिर करण्यात आले.धरणे मंडपा समोर विधीपूर्वक दशक्रिया विधी करण्यात आला. तुकाराम गटमणी पाटील यांनी यावेळी न्याय हक्क समितीच्या वतीने महाराष्ट्र शासन आणि पोलीस प्रशासनाची दशक्रिया केली. शासन व प्रशासनाचे निषेधार्थ त्यांनी आपले मुंडन सुद्धा केले.ह्यावेळी न्याय हक्क समितीचे पदाधिकारी आणि नागरिकांची लक्षणे उपस्थित होती.ह्या दशक्रिया कार्यक्रमाला प्रसेनजीत पाटिल, गजानन वाघ, तुकाराम काळपांडे, अभय मारोडे,मनोज वाघ, रमेश नाईक, डॉ. संदीप वाकेकर,विश्वासराव भालेराव, प्रमोद सपकाळ, अजय पारस्कर,प्रवीण भोपळे, अमर पांचपोर महादेव भालतडक, रमेश ताडे, एम.डी. साबीर, ईरफान खान, शेख जावेद,एजाज देशमुख, विष्णु रोठे,हनुमंत देशमुख,संदीप मानकर, सिद्धार्थ हेलोड़े,आशिष वायझोडे,रतन इंगळे, दत्ता डिवरे,वामन गुड़ेकर,श्रीकृष्ण जाधव, अकील शाह, तुकाराम गटमने यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.