केद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी उपोषण मंडपाला दिली भेट...! शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे दिले प्रशासनाला निर्देश ...!!
बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी.....
चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 14 शेतकऱ्यांनी शेत रस्त्यासाठी उपोषण सुरु केले आहे त्यांच्या उपोषण मंडपास केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट देऊन या शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात संबधीत अधिकऱ्याला निर्देशीत केले.चिखली तालुक्यातील धोत्राभंगोजी येथील विलास हळदे शिवदास कापसे संजय गुजर दुर्गाबाई कापसे मिनाबाई गुजर वर्षा बाई गुजर सुवर्णाबाई भालेकर यांच्यासह 14 शेतकऱ्यांच्या शेत जमिनीसाठी जाणारा शेत रस्ता हा गट क्रमांक 200 मधून दिलेला आहे परंतु अद्याप पर्यंत हा रस्ता वहिवाटीसाठी खुला करण्यात आलेला नाही त्यामुळे या रस्त्यावरील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जाता येत नाही पर्यायाने त्यांची पेरणी थांबली आहे पर्यायाने 30 ते 40 एकर जमीन ही पडीत पडली आहे . पडीत पडलेल्या जमिनीत पेरणी करण्यासाठी शेत रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी या 14 शेतकऱ्यांनी बुलढाणा येथे उपोषण सुरू केले आहे 4 जुलै रोजी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी या शेतकऱ्यांच्या उपोषण मंडपाला भेट दिली व त्यांची समस्या ऐकून घेत यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून चिखली येथील तहसीलदारांशी दूरध्वनीहून संपर्क साधला या शेतकऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना ही त्यांनी यावेळी केल्यात .