गुरांचे लसीकरण व वंध्यत्व निवारण जंत निर्मूलन शिबिर संपन्न...


 
गुरांचे लसीकरण व वंध्यत्व निवारण जंत निर्मूलन शिबिर संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद येथील पशु चिकित्सालय कृषी विज्ञान केंद्र आणि स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे, कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उटी या गावी गुरांचे लसीकरण, वंध्यत्व निवारण तसेच जंत निर्मूलन शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये शेतकऱ्यांना गुरांच्या घटसर्प आली एक टांगल्या आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले गावातील पशुंवर जंत निर्मूलन,गर्भ तपासणी, वंध्यत्व निवारण तपासणी व घटसर्प लसीकरण यावेळी करण्यात आले. यावेळी कृषीकन्यांनी पशु आरोग्य विमा योजनेबाबत येथील ग्रामस्थांना माहिती दिली. शिबिरासाठी आयुक्त डॉक्टर श्वेता मोरखडे तालुका पशुचिकित्सक अधिकारी  तसेच सहाय्यक शिरसाट व गावंडे यांनी पशु सेवक म्हणून काम पाहिले. शिबिर यशस्वीतेसाठी स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई,प्राध्यापक नम्रता खिरोडकार, प्राध्यापक अविनाश आठवडे आणि प्राध्यापक प्रमोद डव्हळे यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी गावचे पोलीस पाटील भाऊराव उमाळे, देविदास उमाळे पंजाबराव माळी संतोष उमाळे यांचे सह कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी विधी इंगळे, नेहा ढोले, प्रणाली कोकाटे, प्राची पळसपगार, साक्षी गणेशपुरे, रुचिका रामरोहिया, प्रेरणा अमृतकर, कांचन कवडे व वैष्णवी राऊत या विद्यार्थिनींनी शिबीर यशस्वीपणे राबविले..

Previous Post Next Post