खामगांवात रेती माफीयांचा खबरी जेरबंद...अधिकाऱ्यांचे लोकेशन देणाऱ्या खबऱ्याच्या मोबाईलमध्ये त्यांच्या अनेकांचे नंबर सेव्ह...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
खामगाव तहसीलदार यांच्या शासकीय निवासस्थानासमोर दुचाकीवर बसून पाळत ठेवून अधिकाऱ्यांच्या हालचालीवर नजर ठेवून गौणखनिज व रेती चोरणाऱ्या वाहतूक ठेकेदारांना मोबाईलद्वारे लोकेशन देणाऱ्या रेतीमाफीयांच्या खबरीला तहसीलदार सुनिल पाटील यांनी आज दुपारी १२.३० वाजता रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे रेती माफीयांच्या खबरीच्या मोबाईलमध्ये त्याच्या मोठया आकांची नावे व झालेले संभाषण ही समोर आले आहे. यामुळे रेती व गौण खनिजाची अवैधरित्या चोरी करणाऱ्या माफीयांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या स्वाधीन केलेल्या खबरीचे नाव आकाश किशोर वाबळे असे आहे. याच्या विरुद्ध तहसीलदार सुनिल पाटील यांनी पोलिसात तक्रार देवून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय मालमत्तेस नुकसान पोहचविणे, गैरकृत्य करणाऱ्यास मदत करणे, चोरी करणान्यास मदत करणे तसेच ग्रुपमधील सर्वसंबंधितांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ व माहिती तंत्रज्ञान कायदा २००० तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ कलमान्वये गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.'मालक' नावाच्या व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये आढळले लोकेशन देणारे संवाद तहसीलदार सुनिल पाटील यांच्या घरासमोर दुचाकी क्रमांक एम. एच. २८ ए.डी. १२७१ द्वारे पाळत ठेवून मालक नावाच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर गौण खनिजाची चोरी करणाऱ्या वाहतूक ठेकेदारांना तहसीलदार तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे लोकेशन पाठविले. खबरी आकाश किशोर बाबळे याच्या मोबाईलची पडताळणी केली असता, त्यात लोकेशन व आगळीक करणे व शासकीय कामात व्यत्यय करणेबाबत संवाद आहे. शिवाय दुसरा ग्रुप 'बाळू वाहतूक संघटना' नावाने असून त्यामध्ये उपविभागीय अधिकारी, पोलिस निरिक्षक यांचे सुद्धा लोकेशन देवून गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे..खबरीच्या मोबाईलमध्ये आकांची नावे: तहसीलदार यांनी केलेल्या कारवाईतील खबरी आकाश वाबळे याच्या मोबाईलम असलेल्या व्हॉटस् अॅपग्रुपमध्ये गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या अनेक आकांची नावे आहेत. ज्यामध्ये किरण ठाकून, देशमुख, शेख आसिफ शेख नबी, सागर बनारे, गोपाल गोंड, विकासभाऊ शेगाव, गणेश बिचारे, अभिजित गावंडे, गौरव दाणे आदींची नावे असल्याचेही तहसीलदार यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या सर्वांच्या फोनमधील संवाद, डाटा, संदेश इत्यादीची तांत्रिक तपासणी करून त्यानुषंगाने सर्व संबंधितांविरुद्ध संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.