जनता विद्यालय च्या विद्यार्थ्यांना अवकाश दर्शनाचा अनुभव...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित जनता विद्यालय जामोद येथील विद्यार्थ्यांनी 3D प्लॅनेटेरियमद्वारे अवकाशातील चित्तथरारक प्रवासाचा अनुभव घेतला. पोलद कंपनी जालना यांच्या सहकार्याने या अद्भुत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ग्रह, तारे, आकाशगंगा, सूर्य, चंद्र यांचे थेट 3D स्वरूपात दर्शन घेतले. इयत्ता 4 थी ते 10वी पर्यंतच्या सुमारे 850 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी या अनुभवातून विज्ञानाविषयी नवी जिज्ञासा आणि आत्मविश्वास प्राप्त केला. भविष्यात वैज्ञानिक घडावेत यासाठी अशा प्रयोगशील उपक्रमांची गरज असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.मुख्याध्यापक आर बी राजपूत यांनी सांगितले की, "विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि कुतूहल हा उपक्रम यशस्वी झाल्याचं प्रतीक आहे.