एस टी कामगार वर्गाच्या न्याय आर्थिक मागण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू-भाजपा जिल्हाअध्यक्ष सचिन बाप्पू देशमुख..सातपुड्याच्या पायथ्याशी जळगाव जामोद नगरीत पार पडला कामगार संघटनेचा मेळावा...


 
एस टी कामगार वर्गाच्या  न्याय आर्थिक मागण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू-भाजपा जिल्हाअध्यक्ष सचिन बाप्पू देशमुख..सातपुड्याच्या पायथ्याशी जळगाव जामोद नगरीत पार पडला कामगार संघटनेचा मेळावा...

जळगाव जा. प्रतिनिधी....

महाराष्ट्राची लोकवाहिनी हा जनतेच्या जिव्हाळ्याचा अविभाज्य घटक असून.एस टि कामगारांच्या प्रलंबित आर्थिक विषय सोडविण्यासाठी शासनाकडे तीव्र पाठपुरावा करू असे प्रतिपादन मान्यता प्राप्त कामगार संघटनेचा बुलढाणा विभागीय मेळावा प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष सचिन बाप्पू देशमुख यांनी केले.या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती मध्ये शिवसेना उबाठा गटाचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख गजानन वाघ हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी विविध पातळी वर एस टी कामगारांच्या पाठीशी आपण भक्कम पणे उभे राहू अशी ग्वाही दिली.कामगारांच्या आर्थिक आणि सामूहिक विषयावर डेपो पातळीपासून ते शासन पातळीपर्यंत सातत्याने प्रयत्न करणारी संघटना म्हणून नावारूपाला आलेली एकमेव मान्यता प्राप्त एस टी कामगार संघटनेचा बुलडाणा विभागीय मेळावा जळगाव जामोद नगरीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.आपल्या प्रास्तविकात विभागीय सचिव राजेंद्र पवार यांनी सन 2020 ते 2024  या कालावधीमध्ये शासन प्रशासनाने मान्य केलेली  6500 रुपये वेतन वाढ चा फरक, महागाई भत्त्याची थकबाकी फरक, घरभाडे भत्त्याचा राहिलेला फरक वेतनवाढ दर चा राहिलेला फरक  या आर्थिक विषयाच्या संदर्भात शासन पातळीवर कामगार संघटना सातत्याने प्रयत्न करीत असून पुढील काही दिवसांमध्ये शासनाने भरली वार्षिक निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून कामगार संघटना येत्या गणपती च्या मुहूर्तावर पुन्हा शासनाला आंदोलनाच्या माध्यमातून घेरण्याची रणनीती आखत आहे असे प्रतिपादन केले.बुलढाणा विभागामध्ये प्रलंबित निवड श्रेणी प्रकरणे, विनंती बदली प्रकरणे, पदोन्नती प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात प्रशासनाला वारंवार निवेदने दिले आहेत त्या माध्यमातून पुढील काही दिवसात हा विषय मार्गी लागेल याबाबत आश्वस्त केले.कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप जी शिंदे यांनी मोबाईल फोन द्वारे या मेळाव्याला संबोधित केले व पुढील आंदोलनात्मक रणनीतीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले.या कार्यक्रमाला नवनियुक्त प्रादेशिक सचिव मनोज घोंगटे पाटील ,ज्येष्ठ नेते पृथ्वीराजसिंह राजपुत , विभागीय अध्यक्ष  महादेव दिवनाले , प्रवीण बुंदे सतीश गोंधळी,  गजानन सोनुने,महेश बुरुंगले ,शेषराव निंबाळकर ,मोहन रहाटे , प्रमोद इंगळे, गणेश इंगळे जनाभाऊ सराफ, शेख अबरार गजानन दुतोंडे,सचिन शेळके मंगेश ढोण,सचिन खिर्डेकर , दीपक निकम ,संदीप पवार,शीतल कोगदे, ज्योती खरे, प्रतिभा वानखेडे, राजू शेळके ,भारत बचाटे,अंकुश झाल्टे, निवृत्ती भोसले,अय्युब खान, डीजी धुमाळे,  गणेश चौधरी ,गणेश पाखरे, गणेश तारापुरे, वावरे , रवी हिरोळे , अनिल चौधरी ,शहाजी देवकते ,विशाल राऊत, विजू कोथळकर,गोपाल भगत,विजू गायकी व अनेक कामगार उपस्थित  होते.गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सचिन पिंगळे यांचा गुणगौरव करण्यात आला.यावेळी मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.ह्या कामगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जळगाव जामोद आगाराचे अध्यक्ष गजानन देशमुख व सचिव प्रमोद खोद्रे यांचेसह जळगाव जामोद आगारातील कामगार संघटनेच्या पदाधिकारी सभासदांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post