गृहराज्यमंत्री व कृषीमंत्री यांचे तात्काळ राजीनामे घ्या जिल्हाध्यक्ष गजानन वाघ... जळगावात शिवसेनेचे अनोखे आंदोलन....
जळगाव जामोद प्रतिनिधी...
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तसेच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात दिनांक २३ जुलै रोजी जळगाव जामोद तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष गजानन वाघ यांच्या नेतृत्वात जोडे मारो आंदोलन तसेच अनोखे पत्ते खेलो आंदोलन करीत दोन्हीही मंत्र्यांचा यावेळी निषेध करण्यात आला तसेच दोन्हीही मंत्र्यांचे राजीनामे घ्या या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार यांचे मार्फत देण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे बी जबाबदार कृषिमंत्री जे नेहमी शेतकऱ्यांविषयी नकारात्मक शेतकऱ्यांविरोधी बोलत असतात तसेच महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे कामकाज चालू असताना ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवत असतात त्या ठिकाणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे कामकाज सोडून जंगली रमी खेळत होते. शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर यांच्याकडे अजिबात वेळ नाही तसेच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे सावली रेस्टॉरंट डान्सबार मध्ये मुली नाचवतात महाराष्ट्रात डान्सबार बंद असताना राज्याचा गृह राज्यमंत्री हा असला कारभार करीत महाराष्ट्राची मान शर्मेने झुकवत आहे. या दोन्हीही निर्लज्ज मंत्र्यांचे तात्काळ मुख्यमंत्र्यांनी राजीनामे घ्यावे अशी मागणी यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गजानन वाघ यांनी केली आहे. तसेच दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे न घेतल्यास शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी गजानन वाघ व तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी दिला. यावेळी उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळापांडे,शिव.अ.प.सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष मुस्ताक भाईजान, विधानसभा संघटक भिमराव पाटील,शहरप्रमुख रमेश ताडे शिवसेनेचे उपशहर प्रमुख चांदभाई कुरेशी,शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख पुंडलिक पाटील,युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल पाटील,मा संपर्कप्रमुख संकेत रहाटे,युवासेना शहरप्रमुख शे.अनिस,मा.शिवसेना शहरप्रमुख कैलास राजपूत,महादेव इंगळे,मा.युवासेना शहरप्रमुख दीपक बावस्कर, शहर संघटक संतोष डब्बे,उपशहर प्रमुख मंगेश कतोरे,सुधीर पारवे विभागप्रमुख,गजानन मांडेकर विभागप्रमुख,युवासेना उपतालुकाप्रमुख कार्तिक राऊत कैलास मिसाळ,आताऊल्ला खान,संजय दंडे, शे.शरीफ कैलाश बघे , रामचंद्र लाहूडकार ,प्रभाकर वहितकार,हरिभाऊ टापरे,मिलिंद वानखडे प्रमोद रोजतकर,भगवान दातीर,सुनील गवई सुनील दूरातकर,किसन राजनकार,शेख फारूख, सै.रहीम ,भगवान दातीर यांच्यासह तालुका भरातील शिवसैनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी केले.