माटरगाव येथे किराणा दुकानातून गांजा पकडला. आरोपी अटकेत..खामगाव येथील डीवायएसपी पथकाची कारवाई...
सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
खामगाव येथील डी वाय एस पी पथकाने माटरगाव येथे किराणा दुकानावर छापा टाकून दुकानांमधून पिशवी मध्ये ठेवलेला 1 किलो 193 ग्रॅम गांजा पकडला असल्याची घटना दि. 11 जुलै रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली असून आरोपीला अटक केली आहे.याबाबत असे की माटरगाव येथील गणेश उर्फ श्याम सुरेश धोटे याच्या किराणा दुकानांमध्ये खामगाव येथील डीवायएसपी पथकाने छापा टाकून दुकानाची झडती घेतली असता दुकानांमध्ये ठेवलेल्या एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हिरवट रंगाचा ओलसर व उग्र वास येत असलेल्या हिरवट रंगाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ असल्याचे मिळून आला आहे. सदर प्लॅस्टिक पिशवीतील हिरवट रंगाच्या गांजाचा आम्ही व पंचांनी वास घेऊन खात्री केली असता सदर पदार्थ हा मानवी मनो व्यापारावर परिणाम करणारा अमली पदार्थ गांजा 1 किलो 193 ग्रॅम कि.23860 रुपये चा माल व नगदी 260 रुपये असा एकूण 24 हजार 120 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.याप्रकरणी फिर्यादी रवी केरबाजी मुंढे सहाय्यक पोलीस निरीक्षक खामगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जलंब पोलिसांनी अप नं. 145/25 कलम 8 (क) ,20 (ब),(ब) गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मानवी मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (N.D.P.S) अधिनियम 1985 अन्वे दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार अमोल सांगळे, रायटर रवींद्र गायकवाड करीत आहे.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी मुंढे, जलंब पोस्टेचे ठाणेदार अमोल सांगळे,पो.उप. नि. सुनील देव,Asi अशोक सुर्वे, पोहेका सुधाकर थोरात, योगेश कुवारे, प्रताप चेपटे, सिमा खिल्लारे,पोका विशाल कोळी, मंगेश सोळंके आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे..