हिवरखेड येथे ठिक ठिकाणी स्वातंत्र्य दीन साजरा,15 ऑगस्ट दिनी श्रीकृष्णा जन्माष्टमी आनंदात साजरी...
हिवरखेड प्रतिनिधी....
हिवरखेड येथे मोठ्या उत्साहाने ठीक ठिकाणी ध्वजारोहण साजरा करण्यात आला,सर्वत्र दिवसभर देश भक्तीगीत व संध्याकाळी श्रीकृष्ण भक्ती गीत कानी पडले,शहरातील नगरपरिषद , पोलिस स्टेशन, आरोग्य केंद्र,जी, प,शाळा, खाजगी विद्यालय, शासकीय स्थळे, काही खाजगी ठिकाण अशा विविध स्थळी थाटात ध्वजारोहण करण्यात आले,
तर संध्याकाळी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने भजन कीर्तने करून रात्री 12 ला श्रीकृष्ण जन्माचे आगमन करण्यात आले, व दुसऱ्या दिवशी दहीहंडी निमित्ताने दहीहंडी फोडण्याची तयारी करण्यात आली, असा हा दोन्ही उत्साह आनंदाचा योगच आला असे समजले जात आहे,

