श्री शंकरराव पुंडकर विद्यालयात स्वातंत्र्यदिन व बक्षीस कार्यक्रम संपन्न...


 
श्री शंकरराव पुंडकर विद्यालयात स्वातंत्र्यदिन व बक्षीस कार्यक्रम संपन्न...

हिवरखेड प्रतिनिधी....

सौन्दळा येथील श्री शंकरराव पुंडकर विद्यालय व क. महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन व बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे सचिव डॉ. प्रमोद अरबट यांच्या शुभहस्ते व संचालक श्री गजाननराव मिरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर श्री गजाननराव मिरगे यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शंकरराव पुंडकर गुरुजी, उपाध्यक्ष श्री नवलकुमार अरबट सचिव डॉ. प्रमोद अरबट सौन्दळ्याचे सरपंच विनोद मिरगे संचालिका सौ. उषाताई पुंडकर, विलास पुंडकर प्राचार्य रमेश ठाकरे यांच्या हस्ते दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी कु. प्रगती रामेश्वर तोरखडे, पियुष गजानन तायडे, कु. श्रुती मारोती चोपडे, कु. आरती कासोटे, कु. दीपाली गाढे, कु. श्रुती शेळके यांना बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाला बहुसंख्य पालक व विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रमेश ठाकरे, सूत्रसंचालन शिक्षक शैलेश तराळे, राजेश टाले यांनी तर आभार प्रदर्शन विलास घुंगड यांनी केले.

Previous Post Next Post