अवैध रित्या रेतीची वाहतूक करणारे टिप्पर पकडले.. रेती सह 20 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.पिंपळगाव राजा पोलिसांची दबंग कारवाई.
सुरज देशमुख/ बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
अवैध रित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्पर ला पिं.राजा पोलिसांनी पकडले असून त्याच्या जवळून रेती सह 20 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची घटना दि.30 ऑगस्ट रोजी पिं.राजा ते निपाणा रोडवर असलेल्या सहकार विद्या मंदिराजवळ घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी टिप्पर चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत माहिती अशी की विना परवाना अवैध रित्या रेतीची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती पिं. राजा पोस्टेचे ठाणेदार मुकेश गुजर यांना मिळताच त्यांनी सापळा रुचून त्यांच्या सहकार्यासह पि. राजा ते निपाणा रोडवर विनापरवाना अवैध रित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्पर ला पकडले असून 2 ब्रास रेती किंमत 7 हजार व अशोक लेलँड कंपनीचे टिप्पर किंमत 20 लाख रुपये असा एकूण 20 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अशी फिर्याद पोका संदीप गावंडे यांनी पिं.राजा पोस्टेला दिली यावरून पोलिसांनी टिप्पर चालक अजय शत्रुघ्न बनकर रा. वसाडी ता. नांदुरा याच्याविरुद्ध अप नं 200/25 कलम 303(2) भारतीय न्याय सहित 2023 सहकलम 50/177 मोटर वाहन कायदा अन्वे गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई ठाणेदार मुकेश गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय किशोर बर्वे ,पोका गोपाल सोनवणे, संदीप गावंडे आदींनी केली आहे..
