मतचोरी रोखण्यासाठी एकवटली तरुणाई... जळगाव जामोद शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धा...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
दिनांक 30 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन उर्फ बंटी दादा सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा घेताना युवकांना मी धावतो मतचोरी रोखण्यासाठी चा संदेश देऊन मॅरेथॉन मध्ये सामील होण्याचे आवाहन तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले होते या मॅरेथॉन स्पर्धेला तरुण वर्गात फार मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन जळगाव जामोद तालुक्यातूनच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून तरुणाई या भव्याच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेऊन मत चोरी रोखण्यासाठीचा आपला सहभाग नोंदविला. याप्रसंगी सहभागी तरुण व उपस्थित लोकांनी देशांमध्ये होत असलेल्या सत्तेच्या लालसेपोटी कुठल्याही स्तराला जाऊन निवडणूक विभागाला वेठीस धरून निवडणूक प्रक्रियेमध्ये हेराफेरी करून मतांची चोरी करून सत्ता हस्तगत केली व संविधानाच्या गळा घोटण्याचे काम विद्यमान सरकारने केलं. चुकीच्या पद्धतीने सत्तेत आलेली मंडळी शेतकरी बांधव महिला भगिनी आणि युवकांना वाऱ्यावर सोडून सत्तेच्या लालसेत व लोभात इतकी अडकली की शेवटी तरुणांना रस्त्यावर येऊन या चुकीच्या मत चोरीच्या विरोधात आपला निषेध नोंदवण्यासाठी मॅरेथॉन च्या माध्यमातून रस्त्यावर येऊन धावली व त्यांच्या भविष्याचा आवाज बुलंद करण्यासाठी पाच किलोमीटर मॅरेथॉन स्थानिक दुर्गा चौक ते सूतगिरणी व परत पुन्हा दुर्गा चौक असे अंतर कापत 350 च्यावर सहभागी होऊन सहभाग नोंदविला यामध्ये प्रथम पाच क्रमांकाच्या सहभागींना अनुक्रमे प्रथम क्रमांकाने अनिल भेंडे ₹7777 यांना भाऊराव भालेराव यांच्या तर्फे , द्वितीय क्रमांकाने ऋषिकेश वावरे ₹5555 अविनाश उमरकर यांच्या तर्फे ,तृतीय क्रमांकाने उज्वल अंकुलेनेकर ₹3333 अच्छे खा हबीब खा यांच्या तर्फे, चतुर्थ क्रमांकाने वैभव बर्डे ₹2222 जुबेर पटेल यांच्या तर्फे आणि पंचम क्रमांकाने गौरव घारड ₹1111 श्रीकृष्ण केदार यांच्या तर्फे अशा प्रकारचे रोख बक्षीस व मेडल सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करून गौरवण्यात आले व उर्वरित सहभागींना सहभागीता प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमांमध्ये पोलीस प्रशासन जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालय नगरपरिषद प्रशासन व नागरिकांनी विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले पंच म्हणून श्री डाबरे सर खवणे सर मजहरहक साहेब ,उद्घाटक म्हणून पंजाब म्हसाळ ओपन अथेलिक व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामविजय बुरुंगले सरचिटणीस प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये ज्योतीताई ढोकणे प्रदेश सदस्य, अविनाश उमरकर संयोजक राजीव गांधी पंचायती राज संघटन, तालुकाध्यक्ष अॕड.भाऊराव भालेराव प्रमोद पाटील डॉ प्रशांत राजपूत समाधान दामोदर अंबादासजी बाठे बालगजानन अवचार प्रवीण भोपळे, अर्जुन घोलप,श्रीकृष्ण केदार एड संदीप मानकर एड अमर पाचपोर जुबेरभाई पटेल,सुनिल येनकर गजानन साबळे विजय हिस्सल हुसेन डायमंड सुरेश वानखडे, अझर देशमुख तोफिक भाई,झहीर भाई ,सलीमशहा , दिनेश काटकर, अयास पूनावाला, हुसेन राही सय्यद अफरोज सचिन जाधव अजय ताठे सुनील कळस्कर अनिल इंगळे अशोक ढोले बालूभाऊ निकम ,शेख जुनेद, संतोष गावंडे, धनंजय बोंबटकर, गौरव इंगळे, प्रमोद भाऊ तितरे अशोक साबे, इम्रान खान राजीक शेख यांचेसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील नागरिक यावेळी उपस्थित होते.