नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 अंतर्गत पिंप्री खोद्री येथील महिला शेती शाळेच्या माध्यमातून गिरवतायेत कृषी तंत्रज्ञानाचे धडे...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
पिंप्री खोद्री गावाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 अंतर्गत समावेश करण्यात आला असून खरीप हंगाम 2025 मध्ये महिलांचे शेतीशाळा हया नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कृषी विभाग जळगाव जामोद यांच्यावतीने दर पंधरवड्याला आयोजन करण्यात येते ,गावामध्ये प्रकल्पाविषयी जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे ,तसाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे महिलांची शेतीशाळा. महिलांचा कृषी क्षेत्रामध्ये मोठा सहभाग आहे,शेतीची कामे महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्यांच्यापेक्षा पुढे राहून करतात, परंतु त्यांच्या या मेहनतीला बदलत्या काळानुसार कृषी तंत्रशिक्षणाचे तांत्रिक ज्ञान देणे आवश्यक आहे. हेच ज्ञान शेती शाळेच्या माध्यमातून पिंप्री येथील महिलांना कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी देत आहेत, पिंप्री येथील सहाय्यक कृषी अधिकारी कुमारी अमृता कदम या दर पंधरवड्याला प्रत्यक्ष सोयाबीनच्या शेतामध्ये महिलांच्या शेती शाळेचे आयोजन करतात. शेती शाळेच्या वर्गामध्ये सोयाबीन बियाणे निवड ते अगदी पीक उत्पादना पर्यंत प्रत्येक टप्प्यावरती सहभागी महिलांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे, तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञानाचे सुद्धा धडे त्यांना शेती शाळेमधून देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे एकात्मिक खत व्यवस्थापन, एकात्मिक तनव्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धती आणि संकल्पना प्रत्यक्ष प्रक्षेत्रावरती जाऊन प्रात्यक्षिकाद्वारे त्या उपस्थित महिलांना शिकविल्या जातात . शेती शाळेला तांत्रिक मार्गदर्शन उप कृषी अधिकारी श्रीकृष्ण शिंदे हे करतात, तसेच महिलांना शेती शाळेमध्ये सहभागी होण्यासाठी गावच्या सरपंच सौ मंगला हरिदास सुलताने या प्रोत्साहित करतात, शेती शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग हा वाढत असून सदर शेती शाळा या तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव व उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांच्या मार्गदर्शनामध्ये घेण्यात येत आहेत.
