शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी ...केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश ...25 आणि .26 जुनच्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या 90383 शेतकऱ्यांना मिळणार 74 कोटीची आर्थिक मदत...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
बुलढाणा जिल्हयात 25 आणि 26 जून रोजी ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील आठ मंडळ क्षेत्रामधील 87 हजार 390.2 हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते .. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठ पुराव्याला यश आले असून सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी 74 कोटी 45 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 25 व 26 जून रोजी ढगफुटीसदृश्य व अतिवृष्टीमुळे 87 हजार 390.2 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते 90 हजार 383 शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला होता. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी धीर देत शासनाकडून तात्काळ मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली होती यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार संजय रायमुलकर होते त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आजित पवार व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली व शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतची दाहकता आणि फोटोग्राफ दाखवुन त्यांच्या लक्षात आणून दिली व या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. शासनाने 6 ऑगस्ट रोजी परीपत्रक काढून बुलढाणा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी 74कोटी 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघात सरासरी 112 मिमी पावसाची नोद झाली होती यामध्ये मेहकर मतदारसंघातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यांना तब्बल 66 कोटींची नुकसान भरपाई मिळणार आहे. मेहकर मतदारसंघातील एकूण 65,601 हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले असून 66 हजार नुकसानग्रस्त शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये जमीन खरडून जाणे,फळबागांचे नुकसान आणि गाळ साचल्यामुळे पीक नष्ट होणाऱ्या सुमारे 6 हजार शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.या तातडीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आजित पवार व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्यक्त करत मतदारांना दिलेला शब्द पाळला असल्याच्या प्रतिक्रिया केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांनी व्यक्त केल्या असून मतदार संघातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर झाल्याबद्दल शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे.