वरवट बकाल जि.प. उर्दू शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी शेख नाझीम उपाध्यक्ष पदि सीमा शेख कदिर...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शेख नाझीम शेख हारून यांची तर उपाध्यक्ष सीमा शेख कदीर यांची पालक वर्गाच्या समन्वयातुन नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित सदस्या मध्ये मौलवी शेख हुसेन शेख महमूद, शहजान बानो शेख इम्रान, अफसरा बी शेख शकील, शिक्षणतज्ञ शेख गफूर शेख रज्जाक, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अश्मिरा अब्दुल नईम व मदिहा फातेमा शेख बिस्मिल्ला , सचिवपदी मुख्यध्यापक अब्दुल राजीक यांचा समावेश आहे. नवनिर्वाचीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख नाझीम शेख हारुन उपाध्यक्ष सिमा कदिर शेख यांचा शेख कदिर सह शाळा ,पालक , उपस्थित नागरिकांनी सत्कार केला यावेळी शेख बिस्मिल्ला शेख रजाक, अब्दुल नईम , हकीम देशमुख, शेख जुबेर शेख मोहम्मद, , शेख शकील शेख वकील, शेख इम्रान शेख मेहबूब, शेख कदीर यांची उपस्थिती होती.