हिवरखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस नेवारे यांचा सेवानिवृत्ती सत्कार सपन्न,हिवऱखेड पत्रकार संघ व चौबे कुटुंबाचा पुढाकार,
हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड पोलिस स्टेशनचे बीट अंमलदार आणि मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्ती महादेवराव नेवारे यांchibनिवृत्ती झाली असून त्यांना माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री नंदकिशोरजी चौबे यांच्या निवासस्थानी निरोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, आदर्श पत्रकार संघआणि इतर पत्रकार बांधव राजेश पांडव, धीरज बजाज, जितेश कारिया, राहुल गिऱ्हे,सूरज चौबे, रितेश टीलावत,अर्जुन खिरोडकार आणि संपूर्ण चौबे कुटुंबीयाचे सदस्य उपस्थित होते.