डॉ. राजधरसिंह राजपूत यांचा कृतज्ञता नागरिक सत्कार सोहळा संपन्न..पिंपळगाव काळे येथील दहावी मधल्या माजी विद्यार्थ्यांच्या अनोख्या सत्कार सोहळ्याचे आयोजन..


 
डॉ. राजधरसिंह राजपूत यांचा कृतज्ञता नागरिक सत्कार सोहळा संपन्न..पिंपळगाव काळे येथील दहावी मधल्या माजी विद्यार्थ्यांच्या अनोख्या सत्कार सोहळ्याचे आयोजन..

मंगल काकडे/पिंपळगाव काळे....

जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये १९९५ च्या दहावी मधील माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने डॉक्टर राजधर सिंग राजपूत यांचा कृतज्ञता नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.स्तुति सुमनानी त्यांचं कौतुक करत भाषणाच्या माध्यमातून त्यावेळेसचे क्षण आठवत आपले वेगवेगळे मत व्यक्त केले त्यावेळेस अकोट ते मुक्ताईनगर एवढ्या मोठ्या १२५ किमी च्या परिसरातील  एम बी बी एस डॉक्टर असलेले राजधरसिंग राजपूत हे एकमेव सुविज्ञ डॉक्टर होते.. त्यावेळची महाराष्ट्रातील एकूण एमबीबीएस डॉक्टरांची परिस्थिती पाहता १९६७ मध्ये हे ७२१ वे एमबीबीएस डॉक्टर होते..एवढी दुर्मिळ व प्रतिकूल परिस्थिती असतानाही अकोला,खामगाव सारख्या शहरात जाऊन आर्थिक भरभराटीचे स्वप्न पाहता आपल्या मातृभूमीत, पिंपळगाव काळे सारख्या खेड्यात तब्बल ५८ वर्ष सेवा पुरवली यासाठी त्यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता...याप्रसंगी जळगाव जामोद चे माजी आमदार कृष्णराव इंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष  प्रकाश पाटील, काँग्रेस पक्ष नेत्या स्वातीताई वाकेकर, सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई टापरे, पणन महासंघांचे उपाध्यक्ष प्रसेंजित पाटील, जि प सदस्य बंडू पाटील यांनी डॉक्टर साहेबांच्या कर्तुत्वांच्या आठवणीला उजाळा दिला याप्रसंगी पुरुषोत्तम अवचार यांनी डॉक्टर राजपूत यांच्या जीवनावरील कविता सादर केली तर १९९५ च्या दहावी बॅचचे, सध्या वसईला कार्यरत असणारे डॉक्टर संतोष अवचार यांनी डॉक्टर राजपूत यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील विशेष योगदान विषयीचे महत्त्व नागरिकांना समजून सांगितले..कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत वातावरणाला भावनिक स्पर्श केला..याप्रसंगी १९९५ च्या टीमतर्फे दादासाहेबांना कृतज्ञतापर सन्मानपत्र देण्यात आले. तसेच जि प सदस्य तथा माजी विरोधी पक्ष नेता बुलढाणा बंडू पाटील,व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, तसेच गणेश हुरपडे यांनी शाल व श्रीफळ देऊन डॉक्टर राजधरसिंह राजपूत यांचे अभिनंदन केले...कार्यक्रमाचे संचालन गजानन देशमुख यांनी केले तर प्रास्ताविक रवी बोडखे यांनी केले.याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच अशोक ढोले,भाऊसाहेब इंगळे, डॉ संदीप वाकेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य वासुदेव भोपळे, ऍड भाऊराव भालेराव काँग्रेस तालुकाध्यक्ष, संजय पांडव भाजपा तालुका अध्यक्ष, डॉ राजेंद्र तानकर,श्रीकृष्ण वानखडे, इनुस आतार, शालिग्राम भोपळे,सचिन जाधव, बालू निकम, अजय ताठे इत्यादी मान्यवरांसोबत बऱ्याच प्रतिष्ठित नागरिकांची विशेष उपस्थिती होती.फारच थोड्या दिवसात नियोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद चोखट, विनोद बहादरे, निलेश भोपळे, सोसायटी अध्यक्ष सुनील काकडे, विनोद इंगळे, संजय ताठे, अक्षय वरणकार, मधुकर ढोले, संतोष काळपांडे, रतन उमाळे, गणेश पांडव, रहेमान खां, भरतसिंग पडोळ, दिनेश काकडे, सुनील काकडे, विनोद टोंगलकर इत्यादींनी परिश्रम घेतले...

Previous Post Next Post