करियर कट्टया अंतर्गत विद्यार्थी संवाद कार्यक्रम संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
स्थानिक बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सलीम पटेल व सहसचिव रब्बानी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंतर्गत विद्यार्थी संवाद कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शेख फराह मॅडम ह्या होत्या.याप्रसंगी प्रभारी प्राचार्या डॉ. फराह शेख मॅडम यांनी शितोळे सर महाविद्यालयात आल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले व करिअर कट्टा अंतर्गत आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांना महाविद्यालयाचे सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही दिली.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र तंत्रज्ञान सहायता केंद्र अध्यक्ष यशवंत शितोळे हे होते त्यांनी कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी चर्चा करताना मोबाईलचा जबाबदारीने वापर कृत्रिम बुद्धिमत्ता चा योग्य उपयोग व वेळेचे महत्व यावर विशेष मार्गदर्शन केले तसेच करिअर नियोजन, रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकास अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा काकोडा येथील प्राचार्य डॉ. पिंगळे व जिल्हा समन्वयक प्रा.व्ही एस आठवार यांची उपस्थिती लाभली.तसेच कार्यक्रमाला कु.स्नेहा पिवळटकर जिल्हा करिअर संसद सदस्य व कु. सानिया नाझ करिअर संसद मुख्यमंत्री ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिअर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक प्रा. पी एन बाठे तर आभार प्रदर्शन करियर कट्टा तालुका समन्वयक प्रा.एन.जी आसोले यांनी केले.