'एक पेड माँ के नाम ' या उपक्रमांतर्गत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न...
जळगांव जामोद प्रतिनिधी ...
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालयात दि.26/07/25 रोजी एक पेड माँ के नाम या पर्यावरण जन जागृती मोहिमेंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन करण्याचा संकल्प केला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी , पर्यवेक्षक प्रा. जी. एस. वानखेडे , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. राजीव देवकर तसेच प्रा. विनोद बावस्कार यांनी वृक्षारोपण करून वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षण बाबत मार्गदर्शन केले. प्राध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थी लवकरच आपल्या आईसोबत आणखी वृक्ष लावतील आणि पर्यावरण रक्षणासाठी आपल्या योगदानाची नोंद करतील असा निश्चय केला.उपक्रमाचे छायाचित्र शिक्षण विभागाने दिलेल्या इको क्लब च्या पोर्टल वर अपलोड केले. या उपक्रमात प्रा. ऋषिकेश कांडलकर, प्रा. विनोद झोपे, प्रा. गणेश जोशी, प्रा. रामेश्वर सायखेडे, प्रा.निलिमा भोपळे समाधान निलजे यांनी सहभाग घेतला. व परिश्रम घेतले.