बारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
स्थानिक श्री संत रुपलाल महाराज भवन जळगांव जामोद येथे दिनांक 27 जुलै 2025 रोजी बारी समाज युवक प्रगती मंडळाच्या माध्यमातून 35 वा बारी समाजातील जळगाव जामोद शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अमर सखाराम ताडे हे होते तर मंडळाचे अध्यक्ष सुहास भुते, हृदयरोग तज्ञ डॉ. एस के दलाल, नगरपरिषद चे माजी उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे, पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता मनोज फुसे साहेब, प्रजापिता ब्रह्मकुमारी च्या प्रीती दीदी, मंडळाचे माजी अध्यक्ष पांडुरंग म्हस्के, माजी सैनिक मारोती म्हस्के यांच्या सुविद्य पत्नी शारदाताई म्हस्के, माजी नगरसेवक श्रीकृष्ण केदार, सखाराम ताडे,नारायण कोथळकर हे उपस्थित होते तसेच विद्यार्थी/विद्यार्थिनी, पालकवर्ग व समाज बंधू भगिनी यांची सुद्धा बहुसंख्येने उपस्थिती होती.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते श्री संत रुपलाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.समाजातील वर्ग 12 मधून आदित्य बोडखे, जयेश केदार, कु तन्वी ढगे, कु पल्लवी ढगे वर्ग 10 मधून रोहित अंबडकार, तेजस ढगे, कु प्राची कोथळकार, कु रोशनी धांडे अशा वर्ग चौथी ते बारावी मधील एकूण 55 गुणवंत विद्यार्थ्यांचा मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. समाजातील काही दानशूर व्यक्तींनी प्रोत्साहन पर वैयक्तिक बक्षीस सुद्धा बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना दिली.ह्याप्रसंगी मान्यवरांची यथोचित भाषणे झाली. प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष रवींद्र काळपांडे यांनी तर संचलन लक्ष्मीताई धुर्डे यांनी केले व आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव रूपेश येऊल यांनी केले.राष्ट्रगीत व पेढे वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीते करता बारी समाज युवक प्रगती मंडळाचे प्रवीण कोथळकर, गजानन डोबे, गजानन कोथळकार, निलेश धुर्डे, गौरव डोबे,संजय कोथळकार, प्रतिक राऊत,सुरज भगत, विक्रांत डोबे, मोहन ढगे,गणेश मिसाळ, व समाज बांधव यांनी अथक परिश्रम घेतले.