हिवरखेड येथे सेवानिवृत्ती व पदग्रहण सोहळा संपन्न...
हिवरखेड प्रतिनिधी....
हिवरखेड येथे दिनाक ३ ऑगस्ट ला महात्मा फुले शिक्षा संस्था हिवरखेड संचालित श्रीमती रतनबाई ताराचंदजी कानुंगा वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जगतची अजाबराव व्यवहारे सर यांच्या सेवा निवृत्ती निमित्त तसेच नवनियुक्त मुख्याध्यापक रवींद्र लक्ष्मणराव सोळंके यांचा पदग्रहण समारोह यांचे अवचिंत साधून दोन्ही आजी-माजी मुख्याध्यापकांच्या कुटुंबासह सत्कार करण्यात आला. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल कुमार भोपळे सर होते. प्रमुख अतिथी गजाननराव वानखडे सर (अध्यक्ष तेल्हारा तालुका काँग्रेस कमिटी) व रवींद्र चोथलमल (शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती तेल्हारा )हे होते. तसेच कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी तसेच संस्थेचे पदाधिकारी, डॉक्टर प्रमोदजी भोपळे उपाध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्था, शामशील भोपळे कार्यवाह महात्मा फुले शिक्षण संस्था हिवरखेड, सुनील राऊत उपाध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्था हिवरखेड, संतोष राऊत सर मुख्याध्यापक सहदेवराव भोपळे विद्यालय हिवरखेड,लक्ष्मणराव सोळंके सेवानिवृत्त मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा बोर्डी,राजेश वानखडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती तेल्हारा तालुका, चंद्रभूषण इंगळे ग्रंथपाल महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय हिवरखेड, मनीष गिरे सर माजी केंद्रप्रमुख हिवरखेड, गजानन राऊत केंद्रप्रमुख हिवरखेड, प्रकाश राऊत माजी केंद्रप्रमुख हिवरखेड, प्रमोद पोके सर पी एम जिल्हा परिषद मुलांची केंद्र शाळा हिवरखेड, निलेश खिरोळकर सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद मुलींची शाळा हिवरखेड, सतीश इंगळे अध्यक्ष प्रेस क्लब हिवरखेड, अलकाताई निलेश खिरोडकर आदर्श गृहिणी, महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या संचालिका अन्नपूर्णाबाई बंड आजी, तसेच महात्मा फुले शिक्षण संस्था संचालिका साधना भोपळे जिल्हा परिषद सहाय्यक शिक्षिका हिवरखेड, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संचालक स्नेहल दादा भोपळे, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे युवा संचालक प्रा.कौस्तुभ दादा भोपळे, गणेश राठोड अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, सत्यदेव तायडे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, संध्याताई जगतराव व्यवहारे मॅडम जिल्हा परिषद स.शिक्षिका चितळवाडी, शितलताई रवींद्र सोळंके सर सहाय्यक शिक्षिका सोगोळा , श्रीमती रतनबाई कानुंगा शाळेचा शिक्षक स्टाफ तसेच सहदेवराव भोपळे विद्यालयाचा शिक्षक स्टाफ , आमचे सर्व माजी शिक्षक बांधव इत्यादींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम क्रांतीसुर्य महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. नंतर मनोगत व्यक्त करून सरांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच जगतजी व्यवहारे सर यांनी आपले अनुभव आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सेवानिवृत्त शिक्षक जगत व्यवहारे सर व संध्याताई व्यवहारे मॅडम यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.व रवींद्र चोथमल सर शिक्षक विस्तार अधिकारी पंचायत समिती तेल्हारा यांचा सुद्धा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. तसेच सोळंके सर व शीतल सोळंके मॅडम यांचा सुद्धा पदोन्नती झाल्याबद्दल नवनिर्वाचित मुख्याध्यापक झाल्याबद्दल सहपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा धुमाळे मॅडम यांनी केले. प्रास्ताविक रवींद्र सोळंके सरांनी केले. तर आभार प्रदर्शन अंकुश हिवराळे सर यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना व मान्यवरांना जेवण देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील स्टाफ व संस्थेतील संचालक गण यांचे मोलाचे सहकार्य लाभले...