त्रिमूर्ती कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव येथे गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांचा सत्कार सोहळा संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद पंचायत समितीचे नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी श्री गणेश व्यवहारे साहेब यांचा स्थानिक समता बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित त्रिमूर्ती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मध्ये सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या विद्या काटले तर प्रमुख उपस्थित सुप्रिया ताई व्यवहारे मान्यवर म्हणून लाभले होते.आपल्या मनोगतातून नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी व्यवहारे साहेब यांनी शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलाबद्दल माहिती दिली. त्या बदलांना सामोरे जाऊन विद्यार्थी हिताच्या दृष्टीने आपण तत्पर असायला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आपल्या कामाशी प्रामाणिक असनारी व्यक्ती जीवनात यशस्वी होत असते हे त्यांनी उदाहरणासह पटवून सांगितले. यावेळी गटशिक्षणाधिकारी साहेबांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला प्रा. माहेश्वरी वाघमारे, प्रा सुप्रियाताई इंगळे, प्रा. रविंद्र निमकर्डे, प्रा. योगेश वारूकार, प्रा. शरद गावंडे उपस्थित होते.