निसर्गाशी आदिवासी समाजाची नाळ जुळली असून आदिवासींच्या संस्कृतीला निसर्गाचा आणि मातीचा सुगंध आहे-गजानन वाघ... रसूलपुर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा...


 
निसर्गाशी आदिवासी समाजाची नाळ जुळली असून आदिवासींच्या संस्कृतीला निसर्गाचा आणि मातीचा सुगंध आहे-गजानन वाघ... रसूलपुर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

आदिवासी समाज अज्ञानी, निरक्षर असेल ही मात्र याच आदिवासीच्या संस्कृतीला निसर्गाचा आणि मातीचा सुगंध आहे. निसर्गाशी आदिवासी समाजाची नाळ जुळली आहे. त्यामुळे आदिवासी संस्कृतीवर निसर्गाचा मोठा प्रभाव दिसून येतो असे मत जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी व्यक्त केले.दिनांक ९ आँगष्ट जागतिक आदिवासी दिन तालुक्यातील रसुलपुर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसूर्य बिरसा मुंडा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,तंट्ट्या भिल्ल यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.त्यानंतर उपस्थितांनी  ‘जय आदिवासी”, बिरसा मुंडा की जय” अश्या घोषणां दिल्याने आसमंत घुमून उठला होता.यानंतर गावातुन मिरवणुकीत टप्याटप्यावर तालबध्द आणि मनमोहक आदिवासी कला अविष्कारांचे सादरीकरण करण्यात आले.आदिवासी संस्कृती व परंपरा, कला इत्यादींची माहिती नव्या पिढीला ज्ञात व्हावी, समाजात एकता निर्माण होऊन बंधुत्व वाढीस लागून विकास घडावा, निसर्गाशी नाते अतूट ठेवत आधुनिक युगाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन समाज विकास घडवा तसेच अत्यंत दुर्गम डोंगर, दऱ्या-खोऱ्यात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाकडे इतरांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलावा असे मत यावेळी तालुकाप्रमुख संतोष दांडगे यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ,उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे,शिवसेना तालुकाप्रमुख संतोष दांडगे, विशाल पाटील,आबिद मोहम्मद शाखा प्रमुख रसुलपुर,इस्माईल जमदार उपशाखा प्रमुख, सुभेदार तडवी, सलीम दरबार तडवी,समीर नजीर तडवी, नामदार तडवी, मतीन तडवी, बशीर इमाम,राजु तडवी, इमरान सादिक, महेबुब सुभान,शाकीर जाकिर तडवी, हुसेन तडवी, रफीक तडवी सिताब तडवी,फरीद तडवी,आसिम तडवी, समशेर तडवी, इमरान तडवी, मोसीन तडवी यांचेसह रसुलपुर येथील तडवी भिल्ल समाज बांधवांसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते गावकरी मोठ्या संख्येने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी उपस्थित होते.

Previous Post Next Post