इंडियन नेव्ही अग्नीवीर मध्ये निवड झाल्याबद्दल रोशन देवचे यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या हस्ते सत्कार....
मंगल काकडे/पिंपळगाव काळे....
जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथील इंडियन नेव्ही अग्नीवीर मध्ये नुकतेच भरती झालेले जवान रोशन रामदास देवचे यांचा त्यांच्या मूळ गावी झाडेगाव येथे दिनांक २४ ऑगस्ट रोजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी त्यांच्या यशाचे कौतुक करत कठोर मेहनतीने भारतीय सैन्यात भरती होण्याची कामगिरी केल्याबद्दल रोशन देवचे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सत्कार केला. तसेच काँग्रेस कार्याध्यक्ष प्रकाश पाटील व काँग्रेस तालुकाध्यक्ष एडवोकेट भाऊराव भालेराव, डॉक्टर प्रशांत राजपूत व ग्रामस्थांच्या वतीने रोशन देवचे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी, माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजि.जि.प.अध्यक्ष तथा काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, एडवोकेट भाऊराव भालेराव काँग्रेस तालुकाध्यक्ष, सोपान ठाकरे, विनोद तायडे, प्रमोद पाटील, डॉक्टर प्रशांत राजपूत, विठ्ठल मोहे, बालू ठाकरे, किसना बाठे, मनोज तायडे, सुपडा उगले, अमन तायडे, जानराव ठाकरे, अनमोल तायडे, विजय इंगळे, रवी बावस्कर,इत्यादींची उपस्थिती होती