पळशी सुपो येथिल ग्रामस्थांचे पंचायत समिती समोर विविध मागण्यासाठी आमरण उपोषण...
जळगांव जामोद प्रतिनिधी:-
पळशी सुपो येथिल सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कोकाटे यांनी पळशी सुपो ग्रामपंचायत मध्ये प्रचंड अनागोंदी कारभार सुरू व घरकुल योजनेमध्ये अनियमितता, रोजगार हमी योजने चे पैसे सुद्धा घरकुल पुर्ण होऊनही मिळाले नाही यासंदर्भात दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी उपोषणकर्ते ज्ञानेश्वर कोकाटे यांनी पंचायत समिती समोर उपोषणाला सुरुवात केली आहे.उपोषकर्ते ज्ञानेश्वर कोकाटे यांना घरकुल मिळण्यापुर्वीच त्यांच्या नावे परस्पर घरकुल रोजगार हमी योजनेचे मस्टर काढण्यात आले विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे प्रशासनातील अधिकारी देतात यारिता पंचायत समिती जळगांव जामोद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे ,तसेच पळशी सुपो येथिलच संतोष सोनोने यांनी सुद्धा १४० गाव पाणी पुरवठा योजनेचे नळामध्ये नालीचे घाण पाणी सतत येत आहे,व घरकुल लाभार्थी यादीमध्ये नाव आणि मागासवर्गीय लाभार्थी असल्यावर सुद्धा गेल्या २५ वर्षापासुन ताब्यात असलेली जागा नियमामाकुल हेतुपुरस्सर ग्रामसेवक करत नाही यामुळे आमरण उपोषणाचे हत्यार उपसावे लागत आहे अशा विविध मागण्यासाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरू आहे.