हिवरखेड येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हिवरखेड एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटीचा रौप्यमहोत्सवी सोहळा उत्साहात....
हिवरखेड प्रतिनिधी–
दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सरस्वती प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर हिवरखेड येथे भारतीय स्वातंत्र्य दिन व हिवरखेड एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी संस्थेचा रौप्यमहोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावर्षी संस्थेच्या यशस्वी 25 वर्षांच्या वाटचालीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला.कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेशचंद्रजी गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर रौप्यमहोत्सवी कार्यक्रमास प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मार्गदर्शक माजी मुख्याध्यापक श्री. रामेश्वरजी भोंगाळे यांनी भूषविले. प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेशचंद्रजी गुप्ता, संस्थेचे सचिव श्री. सतीशभाऊ राऊत, संस्थेचे संचालक श्री. अनिलभाऊ कराळे, श्री. अशोकजी वानखेडे, श्री. किरणभाऊ राऊत, श्री. अरुणभाऊ कवळकार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गजेंद्र वाली, शाळेचे हितचिंतक श्री. दीपकभाऊ राऊत, मुख्याध्यापक श्री. अमोल भोंगाळे, श्री. हर्षल धर्माळ, सौ. प्रिया राऊत, श्री. सुनील सोळंके, श्री. अनिल कवळकार, श्री. सतीश खेट्टे, श्री. गौरव कौलकर, श्री. दीपक धारपवार यांच्यासह गावातील मान्यवर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. अमोलजी भोंगाळे यांनी केले. त्यानंतर संस्थेच्या सन्मानार्थ शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंदाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष,सचिव आणि सर्व संचालक मंडळ यांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.या रौप्यमहोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने संस्थेच्या गेल्या 25 वर्षांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणामध्ये गेल्या 25 वर्षात शिक्षण, महिला सबलीकरण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत भविष्यातही ही वाटचाल ही वाटचाल कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील सोळंके सर तर आभार प्रदर्शन हर्षल धर्माळ यांनी मानले.
